शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये धक्काबुक्की

By admin | Published: August 30, 2016 11:37 PM

वाहतूक पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - वाहतूक पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला. सीताबर्डी ठाण्यात दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप आणि तक्रारीचा पवित्रा घेतला गेला. नंतर मात्र वरिष्ठ अधिकारी आणि आॅटो युनियनच्या नेत्यांनी समंजसपणा दाखवल्याने प्रकरण निवळले.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सोमवारी सायंकाळी वाहतूक शाखेच्या अधिका-यांना उपराजधानीतील विस्कळीत वाहतूक रस्त्यावर आणण्याचे तसेच संबंधित प्रशासनाला रस्त्यावरचे अतिक्रमण हटविण्याचे कडक शब्दात निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर, वाहतूक शाखेतर्फे मंगळवारी सकाळपासून शहरातील विविध भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर धडक कारवाईची मोहिम पोलिसांनी सुरू केली.रेल्वेस्थानकासमोरच्या जयस्तंभ चौकात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे या भागात घुटमळणा-या आॅटोचालकांनाही हुसकावले जात होते. तेवढ्यात प्री पेड आॅटोचालक संघटनेचे पदाधिकारी अल्ताफ अंसारी आॅटो घेऊन चौकातून जात होते. पेट्रोल कमी झाल्यामुळे (रिजर्व लागल्यामुळे) चौकात आॅटो बंद पडला. ते माहित नसल्याने आॅटोचालकांना तेथून दूर करीत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई मुकेश कनाटे यांनी दोन - तीन वेळा त्यांना तेथून लवकर निघा, लवकर निघा, असे आवाज दिले. यातून कनाटे आणि अंसारी यांच्यात बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की झाली. ते पाहून अन्य आॅटोचालकांनी तेथे गोंधळ घालत रस्ता रोको सुरू केला. ही माहिती कळताच राष्ट्रवादी आॅटो यूनियनचे अध्यक्ष तसेच राकांपाचे माजी शहराध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, अन्य एका संघटनेचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्यासह मोठ्या संख्येत आॅटोचालकांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली अंसारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तर, विनाकारण मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप करीत कनाटेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आॅटोचालक संघटनांच्या नेत्यांनी लावून धरली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण बनले. शेवटी ठाणेदार सत्यवीर बंडीवार आणि अजय पाटील यांनी दोन्हीकडील मंडळींना शांत केले. दोघांनीही एकमेकांशी हातमिळवत कोणतीही तक्रार न देण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण शांत झाले. सोमवारी सायंकाळी पत्रकारांनी शहरातील बेशिस्त आॅटोचालक आणि बिघडलेल्या वाहतूकीच्या मुद्याची पोलीस आयुक्तांना माहिती दिली. आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी त्याची दखल घेत तासाभरानंतरच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शहरात विना सायलेंसरच्या बुलेट चालवून फटाके फोडणा-या बुलेटचालकांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. अनेक बुलेट चालकांची तपासणी करतानाच वाहतूक पोलिसांनी १२ बुलेट ताब्यातही घेतल्या. मंगळवारी सकाळपासून १०० पेक्षा जास्त बेशिस्त वाहनचालक, आॅटो आणि स्कूल बसचालकांवर कारवाई करण्यात आली.