शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

सहभागाचे भक्कम पुरावे

By admin | Published: September 17, 2015 2:03 AM

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात संशयित समीर विष्णू गायकवाड याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाल्यानंतरच त्याला अटक करण्यात आली, असे

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात संशयित समीर विष्णू गायकवाड याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाल्यानंतरच त्याला अटक करण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. समीर गायकवाडला बुधवारी प्रथम वर्ग न्यायाधीश आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रतिभानगर येथे गोळीबार झाला होता. त्यामध्ये गोंविद पानसरे यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपीने हत्येचा कट रचण्यासाठी काय तयारी केली होती. या कटाचे धागेदोरे राज्यभर व आंतरराज्यीय पसरले आहेत का? त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ? गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल तसेच गोळ््या कोठून आणल्या?, याची माहिती मिळविण्यासाठी आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडीची, मागणी सहाय्यक सरकारी वकील विशाखा सुरेंद्र भरते यांनी केली.न्यायाधीश डांगे यांनी पोलिसांना तुम्ही कोणत्या आधारावर संशयिताला अटक केली, असा प्रश्न विचारला. त्यावर पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले की, सुरुवातीपासून संशयिताच्या हालचालींवर वॉच ठेवला होता. त्याचे मोबाईल कॉल डिटेक्शन, मुंबई, कोल्हापूर दौरा अशी संपूर्ण माहिती घेतली. त्याच्याकडे चौकशी करून, त्याने दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता त्यामध्ये विसंगती आढळली. त्याचा या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाल्यानंतरच त्याला अटक केली आहे. त्यानंतर न्या. डांगे यांनी गायकवाडला ‘तुझं म्हणणं काय आहे,’ अशी विचारणा केली. त्याने हल्ला झाला त्यादरम्यान मी दीड-दोन महिने कोल्हापुरात नव्हतो. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना पोलिसांनी मला अटक केली असल्याचे सांगितले. त्यानंतर न्या. डांगे यांनी आरोपी गायकवाड याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी पकडला असल्याचे समजताच मेघा पानसरे, कबीर पानसरे, मिलिंद कदम, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते न्यायालयात आले. न्यायालयातील सुनावणीवेळीही ते उपस्थित होते.पोलीस कोठडीची मागणीआरोपीच्या वकिलानेच आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्याची घटना बुधवारी पानसरे हल्ल्यातील संशयिताच्या बाबतीत घडली. त्यांच्या हत्येतील मारेकऱ्यांचे वकीलपत्र कुणीच घ्यायचे नाही, असा निर्णय कोल्हापूर बार असोसिएशनने घेतला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला बचाव करण्याची संधी न दिल्यास न्यायालय आरोपीस न्यायालयीन कोठडी देते. त्यामुळे काही करून त्याचे वकीलपत्र घेण्यासाठी कुणीतरी वकील उभा करणे आवश्यक होते. म्हणून परजिल्ह्यातील एका वकिलास विनंती करून त्याच्याकडे हे वकीलपत्र देण्यात आले. त्याने हे वकीलपत्र सक्तीने घेतले होते. ऐच्छिक नव्हते; त्यामुळे त्यानेच न्यायालयात आरोपीस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या कलमान्वये कारवाई : गायकवाड यास भादंवि कलम ३०२ (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न) व ३४ (कट रचणे) आणि भारतीय हत्यार कायदा कलम ३ आणि २५ (बेकायदेशीरपणे हत्यार जवळ बाळगणे) या कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. संशयित आरोपीकडून २५ हजार कि मतीचे दोन जुने मोबाईल हॅण्डसेट पोलिसांनी जप्त केले आहेत.पानसरे हत्येशीच तपास केंद्रित : या संशयित गायकवाड याचा दाभोलकर व कलबुर्गी यांच्या हत्येशी संबध असल्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे का, असे विचारले असता संजयकुमार यांनी आता आम्ही फक्त पानसरे हत्येशीच व त्यांचेच मारेकरी शोधून काढण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.पानसरे हत्या प्रकरणाचा घटनाक्रम १६ फेब्रुवारी : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार. ‘अ‍ॅस्टर आधार’ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल. खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल १७ फेब्रुवारी : महाराष्ट्र-कर्नाटकात पोलिसांची पथके रवाना २० फेब्रुवारी : प्रकृती खालावल्याने गोविंद पानसरे यांना सकाळी मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलविले. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पानसरेंचा मृत्यू.२१ फेब्रुवारी : पानसरे यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार. २३ फेब्रुवारी : दूधगंगा नदीमध्ये संशयित दुचाकी सापडली २६ फेब्रुवारी : मुंबई क्राईम ब्रँचचे पथक कोल्हापुरात दाखल ११ मार्च : डाव्या पक्षांतर्फे मुंबई मंत्रालयावर भव्य मोर्चा. पानसरे यांच्यावर दोघांनी गोळ्या झाडल्याचे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल २१ एप्रिल : पानसरे हत्येचा तपास ‘एसआयटी’कडे२३ एप्रिल : ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार कोल्हापुरात. तपासासाठी २२ पथकांची नियुक्ती ६ जून : संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्रे व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध १६ सप्टेंबर : पानसरेंच्या संशयित मारेकऱ्यास सांगलीत अटकगोव्यातील आश्रम संशयाच्या फेऱ्यातपानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याचे गोव्यातील सनातन संस्थेशी लागेबांधे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एटीएसचे विशेष तपास पथक कालपासून फोंडा पोलिसांच्या संपर्कात आहे.समीर व त्याची पत्नीही सनातनची साधक आहे. ती गोव्यातील रामनाथी-बांदोडा आश्रमात वास्तव्याला असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली आहे. तिला अटक करण्याच्या प्रयत्नात एटीएस असल्याचे सूत्रांनी सांगितले. मलगोंडा पाटीलशी संबंध : मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व सनातनचा साधक मलगोंडा पाटील याच्याशी समीरचा संबंध होता, हे तपासात स्पष्ट झाले आहे. मलगोंडा मडगावातील बॉम्बस्फोटाचा मास्टरमार्इंड होता, असा एनआयएचा दावा होता. स्फोटात संस्थेच्या दोन साधकांचा मृत्यू झाला होता. एनआयएने सनातनशी संबंध असलेल्या नऊ जणांवर आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता झाली.