- कोकणातही मुसळधार
पुणे/मुंबई/अलिबाग : दीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारी खऱ्या अर्थाने ‘मुंबईचा पाऊस’ अनुभवायला मिळाला. ‘घ्या एकदाचा पाऊस...’ असे भरून वाहणारे सुखद चित्र मुंबईसह उपनगरांमध्ये पाहायला मिळाले. कोकणात तिसऱ्या दिवशीही मुसळधार कायम असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, तसेच विदर्भातील काही भागातही जोरदार वृष्टी झाली. हमखास पावसाचा बेल्ट समजल्या जाणाऱ्या घाटमाथ्यावरचा पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. रात्रीनंतर जोर धरलेल्या पावसाची संततधार शनिवारी रात्रीपर्यंतही सुरूच होती. वसई, विरार, ठाणे, डोंबिवली तसेच पनवेलपर्यंत पावसाचा जोर कायम होता. चौथा शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश मुंबईकरांनी घरीच बसून या पावसाचा आनंद लुटला. अपेक्षेप्रमाणे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)