१५ मे पासून मासेमारी बंदीला ठाम विरोधमनोहर कुंभेजकर / मुंबई : मासेमारी बंदीसाठी १५ मे पासून काही मच्छीमार संघटनानी आवाज उठविला असला तरी त्याला वेसावकरांनी विरोध दर्शविला आहे. शासनाच्या निणर्यानुसार १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत वेसावे कोळीवाडयातील मासेमारी बंद राहणार आहे, असे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी स्पष्ट केले आहे.पृथ्वीराज चंदी यांनी सांगितले की, वेसावे कोळीवाडयात येथील सुमारे ४०० मासेमारी नौका मालकांची तातडीची सभा झाली. मत्स्यदुष्काळ, डीझेलचा १४-१५ महिने न मिळालेला परतावा, कामगारांची कमतरता, इत्यादी मच्छीमारांसमोर जटील समस्या असून, १५ मे पासून एक महिना अगोदर मासेमारी बंद करणे वेसावकरांना परवडणारे नाही. त्यामुळे या सभेत उपस्थित ४०० मासेमारी नौका मालकांनी १५ मे पासून मासेमारी बंद करण्यास विरोध केला आहे. ९ जूनपर्यंत येथील मासेमारी सुरूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात घेण्यात आला आहे.शासन निणर्यानुसार ९ जून पर्यंत मासेमारी चालू ठेवण्याची मुभा असताना या निणर्यामध्ये ढवळाढवळ कोणी करू नये. मासेमारी बंदी कालावधी बाबतीत मच्छीमारांशी चर्चा करून शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप टपके यांनी केली. ठाणे जिल्हा वगळता महाराष्ट्रातील चार सागरी मच्छीमार जिल्ातील मच्छीमारांच्या प्रतिनिधीच्या बरोबर चर्चा केली असता त्यांनी सुद्धा १५ मे पासून मासेमारी बंदीला विरोध केल्याचे टपके यांनी स्पष्ट केले.तर परप्रांतीय मच्छीमारी बोटींनी महाराष्ट्रात धूमाकूळ घातला असून त्यांच्या अमर्याद मासेमारीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे परप्रांतीय बोटीना महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी केली................
१५ मे पासून मासेमारी बंदीला ठाम विरोध
By admin | Published: May 10, 2014 7:41 PM