शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

संघर्षाची अपंगत्वावर मात!

By admin | Published: January 02, 2015 12:51 AM

अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही.

नागपूर : अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयसिंह चव्हाण होत. जयसिंह चव्हाण यांनी आपल्या अपंगत्वावर मात केली आणि आज कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. दुसऱ्याच्या मदतीशिवाय जे कधी काळी उभे राहू शकत नव्हते, ते आज शेकडो लोकांचे पालनहार बनले आहेत. जयसिंह चव्हाण हे केवळ ३६ वर्षाचे आहेत. जयसिंह हे जन्मजात अपंग नव्हते. वयाच्या दीड वर्षापर्यंत ते अगदी ठणठणीत होते. परंतु डॉक्टरने दिलेल्या एका चुकीच्या इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन झाली आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत ते घराबाहेर पडले नाही. इतवारीतील घराच्या गॅलरीमधून ते लोकांना पाहत असत. लहान मुले खेळताना बघितली की त्यांनाही खेळावेसे वाटायचे परंतु इलाज नव्हता. गणेशोत्सवादरम्यान एकदा वस्तीमध्ये संगीतखुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जयसिंह यांनीही भाग घेतला. त्यांच्या दोन्ही हात आणि अधू झालेल्या पायांमधून रक्त वाहू लागले होते. मात्र शेवटी त्यांनी ही स्पर्धा जिंकली. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तेव्हापासून त्यांनी मागे वळू पाहिले नाही. आईने दिलेल्या २०० रुपयामधून त्यांनी कपडे धुण्याची पावडर तयार करण्याच्या कामापासून सुरुवात केली. आपल्या ट्रायसिकलवर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्याला ‘रंजना ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज’ असे आईचे नाव दिले. पाहता पाहता कोट्यावधी रुपयाची उलाढाल करणारा हा उद्योग बनला. इतरांनाही त्यांनी रोजगार दिला. ते दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनले. परंतु त्यांचा लढा इथेच संपला नाही. २०१० साली त्यांच्या कंपनीत आग लागली आणि संपूर्ण कंपनी बेचिराख झाली. अशा वेळीही खचून न जाता त्यांनी नवीन उद्योग उभारणीस सुरुवात केली आणि आॅईल रिफायनरी इंडस्ट्रीज उभी केली. बुटीबोरीतील ही कंपनी आज कोट्यवधीची उलाढाल करीत आहे. ही कंपनी आज अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत असून जयसिंह हे आयकॉन बनले आहेत.