शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

एसटीचा बीओटीला फाटा - रावते

By admin | Published: April 13, 2016 1:56 AM

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजे बीओटी तत्त्वाऐवजी आता एसटी महामंडळ स्वत:च राज्यात नवीन आधुनिक बसस्थानकांची उभारणी करेल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजे बीओटी तत्त्वाऐवजी आता एसटी महामंडळ स्वत:च राज्यात नवीन आधुनिक बसस्थानकांची उभारणी करेल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत जाहीर केले. बीड, येवला, उस्मानाबाद, रत्नागिरी, रहिमतपूर, मसवड, संगमनेर या एसटी बसस्थानकांच्या दुरवस्थेबाबत माजी मंत्री राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. बीओटीवर ही स्थानके उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता एसटी महामंडळ स्वत:च त्यांची उभारणी करेल. भांडवली कामांसाठी यंदा १२५ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे, असे चर्चेला उत्तर देताना रावते यांनी स्पष्ट केले. राज्यात ७६८ बसस्थानके असून त्यातील तातडीची गरज असलेली स्थानके एसटी महामंडळ विकसित करणार आहे. या आधी सरकार एसटी महामंडळाला स्वतंत्र निधी भांडवली कामांसाठी देत नसे. मात्र, आता राज्य सरकारने यंदा १२५ कोटींचा निधी भांडवली कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे. प्रवासी करापोटी जे उत्पन्न सरकारला मिळते, त्यातील ४१९ कोटींचे उत्पन्न सरकार एसटीला देणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळ स्वत:च्या निधीतून एसटी स्थानके विकसित करेल, असे रावते म्हणाले. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांबाबत, दर्जाबाबत तक्रारी असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने नवीन स्मार्ट बसगाड्या एसटीत आणण्याचे ठरविले आहे. एसटी महामंडळात प्रथमच २०० सुरक्षा रक्षकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)