शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

कर्नाटकात एसटीचे ‘जय महाराष्ट्र’

By admin | Published: June 02, 2017 3:56 AM

‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाला परिवहन महामंडळाकडून (एसटी) जोरदार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाला परिवहन महामंडळाकडून (एसटी) जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. एसटीच्या नव्या बोधचिन्हात ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश करण्यात आला असून, ते लवकरच एसटीच्या सर्व वाहनांवर दिसणार आहे. विशेष म्हणजे नवे बोधचिन्ह असलेली पहिली बस शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रल आगारातून बेळगावकडे रवाना करण्यात येणार आहे.‘जय महाराष्ट्र’चा उद्घोष करीत जाणाऱ्या या पहिल्या एसटी बसला स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावते हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे कळते. तसेच या बसच्या चालक आणि वाहकाचा सातारा, सांगली आदी ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे. गुरुवारी एसटीच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही माहिती मिळाली. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथील आगारात हा कार्यक्रम झाला.‘शिवशाही’ अवतरलीतांत्रिक कारणांमुळे तब्बल दीड वर्ष रखडलेली ‘शिवशाही’ वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दाखल करण्यात आली. दाखल झालेल्या या वातानुकूलित बसची सेवा १० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत रत्नागिरीसह मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, शेगाव, शिरपूर, परभणी, जळगाव, लातूर, बीड या मार्गांवर टप्प्याटप्प्याने एसटीच्या स्वमालकीच्या १ हजार अत्याधुनिक शिवशाही धावणार आहेत. तसेच एसटीच्या शयन बसही लवकरच ताफ्यात येणार असल्याची माहिती या वेळी रावते यांनी दिली.कर्मचाऱ्यांसााठी १ हजार घरेएसटीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांसाठी वातानुकूलित सेवा आणि एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ‘एसटी क्वॉर्टर्स’ची घोषणा या वेळी करण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी १ हजार घरे कुर्ला येथे उभारण्यात येणार आहेत. या एसटी क्वॉर्टर्समध्ये शाळा, मॉल आणि अन्य सुविधांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती रावते यांनी दिली. ‘आॅपरेशन शटल’ राज्यात आणि विशेषत: खेडेगावात अवैध वाहतूक बंद करण्यासाठी एसटी प्रशासनाच्या वतीने ‘आॅपरेशन शटल’ हा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत ५० ते १३० किमी अंतरावरील दोन शहरे-खेडे किंवा गावांमध्ये एसटी शटल सेवा सुरू झाली. ठरावीक अंतराने दोन्ही बाजूंनी एसटी चालवण्यात आल्या. राज्यात १२ ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.शुक्रवारी मार्गस्थ होणार‘जय महाराष्ट्र’या नवीन बोधचिन्हासह शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रल आगार येथून मुंबई-बेळगाव ही पहिली एसटी मार्गस्थ होईल. तिला परिवहन मंत्री दिवाकर रावते हे हिरवा झेंडा दाखवतील. या एसटी चालक, वाहकाचा सातारा, सांगली आणि सोलापूर येथे गौरव करण्यात येईल.अधिकाऱ्यांची नियुक्ती करणारखासगी यंत्रणेच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटीची शिवशाही धावणार आहे. राज्यातील आगारांमध्ये अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. हे अधिकारी माजी लष्कर अधिकारी असतील.अत्याधुनिक ‘शिवशाही’ संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसमध्ये ४५ आसने आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी मोफत वाय-फाय देण्यात आले आहे. शिवाय एलईडी स्क्रीन, गाणी ऐकण्यासाठी हेडफोन सुविधा प्रत्येक आसनासाठी देण्यात आली आहे. मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग पॉइंट, प्रवासात वाचन करण्यासाठी दिवा आणि पुशबॅक आसन व्यवस्थाही पुरविण्यात आली आहे. महिला चालकांसाठी ४५० अर्ज एसटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. चालक-वाहक आणि अन्य पदांसाठी ही भरती असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरतीसाठी परीक्षा होणार आहे. यामध्ये महिला चालकांच्या पदांचादेखील समावेश असून, या पदासाठी ४५० महिलांचे अर्ज आले आहेत.