चंद्रकांत शेळके - अहमदनगर
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील सततच्या घसरणीमुळे गेल्या दोन महिन्यांत डिङोलच्या दरात घट झाली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाडय़ात
कपात केलेली नाही. एरवी डिङोल दरात रुपया-दोन रुपयांची वाढ झाली तरी दरवाढीची तत्परता दाखवणारे एसटी महामंडळ आता डिङोल तब्बल सहा रुपयांनी कमी झाले तरी कपातीबाबत मौन बाळगून आहे. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या ‘आपोआप भाडेवाढ सूत्र’नुसार इंधन, बसचे सुटे भाग, तसेच कर्मचा:यांना देण्यात येणारे विविध भत्ते यापैकी एखाद्या घटकापोटी एसटीला नुकसान सोसावे लागले, अगर मोठा तोटा होत असेल तेव्हा एसटी भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे देत असते.
प्राधिकरणाने वेळोवेळी त्याला मंजुरीही दिलेली आहे. परिणामी
गेल्या वर्षभरात चार वेळा तब्बल
8.39 टक्के भाडेवाढीची झळ प्रवाशांना सोसावी लागली. एसटी महामंडळाने आतार्पयत केलेल्या जवळपास सर्वच भाडेवाढीच्या वेळी डिङोलच्या दरवाढीचे कारण दिलेले आहे.
गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असल्याने इंधनाचे दर झपाटय़ाने कमी होत आहेत. यात ऑगस्ट 2क्14 अखेर 67.26 रुपये असणारा डिङोलचा दर नोव्हेंबर 2क्14र्पयत 61.क्4 रुपये झाला आहे. म्हणजे दोन महिन्यांत डिङोलचे दर तब्बल 6.22 रुपयांनी कमी झालेले आहेत. तरीही एसटीने प्रवासी भाडय़ात एका पैशाचीही कपात केलेली नाही. दुसरीकडे गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ, कर्मचा:यांना महागाई भत्ता आदी कारणो देत एसटीने चार वेळा भाडेवाढ केली.
च्एसटीची भाडेवाढ किंवा कपात ही इंधन दर, वाहनांचे सुटे भाग किंवा इतर तोटा याच्या किमतीवरून ठरत असते. सध्या डिङोलचे दर जरी घटले असले तरी एसटीचा आधीचाच तोटा खूप आहे.
च्मध्यंतरीच्या काळात कर्मचा:यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याने मोठी रक्कम खर्ची पडली. सध्या एसटीचा आर्थिक आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. त्यानंतर काय तो निर्णय घेऊ, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिली.
7 नोव्हेंबर 2क्132.6क् }
7 मार्च 2क्142.5क् }
1 जून 2क्142.48 }
31 जुलै 2क्14क्.81 }
एकूण8.39