लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय पद्धतीने होणार आहे. माझ्यासह कोणाचाही वशिला इथे चालणार नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी भूलथापांना बळी न पडता परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. येत्या २ जुलै रोजी चालक, वाहक पदाच्या लेखी परीक्षा आहेत. कोकण विभागातील ७९२९ चालक-वाहक पदांसाठी ही परीक्षा आहे.विविध २७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आमिषाला फसू नका-परीक्षा प्रक्रियेत कुठेच मानवी हस्तक्षेप असणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी आमिषाला फसू नये, असे पत्रकच एसटी प्रशासनाने काढले आहे.
‘एसटीची भरती प्रक्रिया पूर्णत: संगणकीय’
By admin | Published: June 30, 2017 1:57 AM