मुंबई : आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रक्रियेत सामील होता येणार नाही, असा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे टिष्ट्वट शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.यासंदर्भात मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे म्हणाले, की नियमानुसार अकरावी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नव्हता. त्यासाठी प्रवेश रद्द करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमागे शिक्का मारण्याचे आदेशही दिले होते. आॅनलाइन प्रक्रियेत सामील न झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आॅनलाइन पद्धतीत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र या नियमात बदल झाल्याची माहिती शुक्रवारी शिक्षण विभागाने कळवली. तिसऱ्या आॅनलाइन कट आॅफ लिस्टनंतरही महानगर क्षेत्रातील ८०,२९० जागा रिक्त राहिल्या आहेत, तर केवळ पाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे आॅफलाइन प्रवेशानंतर रिक्त जागांमधील कितपत जागा भरतील यात शंकाच आहे. मात्र आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसलेल्यांना आॅफलाइन प्रवेशामुळे बेटरमेंटची संधी मिळणार आहे.------------शाखानिहाय रिक्त जागाआटर््स - १९ हजार ४०३कॉमर्स - ४० हजार ६२७सायन्स - २० हजार २६०एकूण - ८० हजार २९०--------------आॅफलाइनचे वेळापत्रककनिष्ठ महाविद्यालयाने रिक्त जागांची माहिती शनिवारी ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.शाळा सोडल्याचा मूळ दाखला व गुणपत्रिका आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज द्यावे. अर्जाचे वितरण व संकलन १३ ते १५ जुलैदरम्यान करावे.शाखानिहाय गुणवत्ता यादी १६ जुलैला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल.यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि १७ जुलैला प्रवेश घ्यावेत.१८ जुलैला रिक्त जागांचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा.
विद्यार्थ्यांना आता आॅफलाइनचाही मार्ग
By admin | Published: July 11, 2015 2:44 AM