आकोट (जि. अकोला): उत्तरपत्रिका दाखविण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयातच हाणामारी होऊन, इयत्ता अकरावीच्या एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील आकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमिवर आकोट शहरात बंद पाळण्याचा प्रयत्न झाला; मात्र पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. बाबू जगजीवनराम ज्युनिअर कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेच्या उत्तरपत्रिका सोमवारी सकाळी शिक्षिकेने विद्यार्थी शुभम रमेश ढगे (वय १६, रा. नाका क्रमांक ४, अंजनगाव रोड) याला कार्यालयात ठेवण्यास सांगितल्या. तेवढय़ात त्याला विद्यार्थी ऋषभ राजू रायबोले याने स्वत:ची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी मागितली; मात्र शुभमने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. ऋषभने शुभमला मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या छाती व गुप्तांगाला जबर दुखापत झाली. या घटनेनंतर त्याला लगेच खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. ही घटना शहरात वार्यासारखी पसरून ग्रामीण रूग्णालयावर महिला, पुरूषांचा मोठा जमाव धडकला. काहींनी आकोट बंद करण्यासाठी पुढाकार घेत कॉटन मार्केटकडे धाव घेतली. या ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. दगडफेक व पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर बाजारपेठ काही वेळ बंद होती. पोलिसांनी पुढाकार घेतल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले. सायंकाळी याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. जमावावर सौम्य लाठीचार्च विद्यार्थ्यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनाने जमावाचे समाधान झाले नाही. अशातच पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्याने जमाव आक्रमक झाला. काहींनी आकोट बंद करण्यासाठी पुढाकार घेत कॉटन मार्केटकडे धाव घेतली. या ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. महिलांच्या संयमाला सलाम विद्यार्थ्याच्या खुनानंतर कारवाईसाठी युवक प्रचंड आक्रमक झाले होते. मात्र, बारगण परिसरातील महिलांनी युवकांची समजूत काढली. त्यानंतर युवक शांत झाले. शुभमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच अंजनगाव रोडवरील नाका क्रमांक ४ जवळ राहणार्या शुभमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्याचे वडील रमेश ढगे हे शेतमजूर आहेत. त्याला आई, दोन बहिणी आहेत. तो अभ्यासात हुशार होता, असे त्यांच्या परिचितांनी सांगितले.
महाविद्यालयातच विद्यार्थ्याचा खून!
By admin | Published: December 15, 2015 2:02 AM