शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

दहावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना दिलासा

By admin | Published: June 16, 2016 3:13 AM

राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पाच टक्के वाढीव गुण व स्पोर्ट कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास १७ जूनपर्यंत

मुंबई : राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पाच टक्के वाढीव गुण व स्पोर्ट कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास १७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्पोर्ट क्लबचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे सादर करण्यास बोर्डाने २० मेपर्यंत मुदत दिली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान गोंधळ होऊ नये, यासाठी २० जूनपर्यंत वाढीव गुणांसह पुरवणी गुणपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने बोर्डाला दिले आहेत.दादरच्या बालमोहन विद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन राजमाचीकर याने इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या आॅल इंडिया फुटबॉल असोसिएशन (एआयएफए) व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (वायफा) आयोजित असलेल्या नाईकी कप-२०१६ मध्ये भाग घेतला होता. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळणाऱ्यांना शालांत परीक्षेमध्ये अतिरिक्त पाच टक्के गुण व स्पोर्ट कोट्यातून प्रवेश द्यावा, असे राज्य सरकारच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. बोर्डाने प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी २० मे ही अंतिम तारीख दिली होती. मात्र हर्षवर्धन याविषयी अनभिज्ञ होता. ३ जूनला शाळेने आॅनलाइन प्रवेशासंबंधी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्यावर हर्षवर्धनला ही बाब समजली. मात्र तोपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत संपली होती. त्यामुळे हर्षवर्धनने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. एम.एस. संकलेचा व न्या. ए.के. मेनन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती.याचिकाकर्त्याने केवळ नाईकी कप-२०१६ मध्ये सहभाग घेतला असून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला नसल्याने त्याला वाढीव गुण मिळवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देऊ शकत नाही, अशी भूमिका वायफाने घेतली. राज्य सरकारने याचिकाकर्त्याच्या दाव्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने वायफाचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यास नकार देत हर्षवर्धन याला तातडीने प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) शाळा, संघटनांना माहिती द्या - बोर्डाला सूचनाहर्षवर्धनप्रमाणे अनेक खेळाडू विद्यार्थी असू शकतात. ज्यांना स्पोर्ट कोट्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नाही, त्यांना ऐनवेळी प्रमाणपत्रांसाठी धावपळ करावी लागू शकते, अशी भीती खंडपीठाने व्यक्त केली. बोर्डाला सर्व शाळांना व संबंधित संघटनांना खेळाडू विद्यार्थ्यांना शासनाच्या अधिसूचनेची माहिती देण्याचे निर्देश दिले.तातडीने प्रमाणपत्र द्यावेसंबंधित संघटनांनी स्पोर्ट कोट्याचे लाभ मिळवण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, तसेच बोर्डाने ते १७ जूनपर्यंत स्वीकारावे, असे आदेश देत उच्च न्यायालयाने २० जूनपर्यंत अशा विद्यार्थ्यांची गुणपत्रिका (वाढीव गुणांसहित) संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे निर्देशही बोर्डाला दिले.