मुंबई : सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे असते. त्यामुळे हेल्मेट ही सक्ती न समजता सुरक्षेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. अधिकाधिक तरुणांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी आणि पोलीस विलास शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिडनॅहम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी हेल्मेट घालून सिडनहॅम महाविद्यालय ते हुतात्मा चौक असा शांततापूर्वक कँडल मार्च काढला.सिडनहॅम महाविद्यालयाच्या एन एस एस आणि बृहाहा १६ या गटाच्या विद्यार्थ्यांनी या कँडलमार्चचे आयोजन केले होते. दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ किती महत्त्वाचे असते. हे पटवण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. यात १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करणाऱ्या पोलीस विलास शिंदे यांना काही तरुणांनी मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत खेदजनक घटना असून या घटनेचा निषेध दर्शविण्यासाठी व हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते, असे महाविद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब खेमकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हेल्मेटसक्तीसाठी विद्यार्थ्यांचे कँडल मार्च
By admin | Published: September 19, 2016 1:58 AM