११ हजार जागा : ३ हजार अर्जनागपूर : शिक्षक म्हणून करिअर घडविण्याकडे दिवासेंदिवस विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसून येते. नागपूर विभागातील ११ हजार २०१ डी.एड जागांसाठी केवळ ३ हजार ९६ अर्ज आल्याने या अभ्यसाक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कामी झाला असल्याची पावतीच मिळाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात डी.एड अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये बंद पडणार काय अशी परिस्थिती तयार झाली आहे.राज्यात सुमारे १२०० हून अधिक डी.एड. अभ्यासक्रम चालविणारी महाविद्यालये आहेत. मागील वर्षी राज्य शासनाने राज्यातील सर्व डी.एड महाविद्यालयाची चोकशी केली होती. मागील काही वर्षांत डी.एड. करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मागील वर्षी नागपूर विभागात डी.एड. संस्थांमधील सुमारे ६ हजार जागा रिक्त होत्या. यावर्षी ही पुन्हा रिक्त जागांची संख्या वाढणार असल्याचे दिसून येते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात ९ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढलेल्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे मागील वर्षीपेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी डी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश घेतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सद्यस्थितीत असलेले शिक्षणातील चित्र पहाता विद्यार्थ्यांनी डी.एड. प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. अशी परिस्थिती केवळ खाजगी महाविद्यालयांतच आहे असे नाही तर शासकीय डीटीएड व डायट संस्थातही दिसून येते. मागील वर्षीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी युजीसीच्या नेट-सेट परीक्षेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल केवळ चार टक्के लागल्याने ्रविद्यार्थ्यांची पुरती निराशा झाली होती. शिवाय अनुदानित शाळांमध्ये डी.एड किंवा बी.एड. धारकांची निवड करताना टीईटी कम्पल्सरी केल्याचा देखील परिणाम दिसून आला आहे. यामाध्यमातूण चांगल्या शिक्षकांची निवड करणे हा शासनाचा हेतू होता. (प्रतिनिधी)
डी.एड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थीच मिळेना
By admin | Published: July 07, 2014 12:57 AM