शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विद्यार्थी मुकले नेट परीक्षेला

By admin | Published: January 22, 2017 2:10 PM

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनकडे (सीबीएसई) देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 22 - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनकडे (सीबीएसई) देण्यात आली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून सीबीएसईच्या अधिका-यांकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडे असंवेदशीलतेने पाहिले जाते. परिणामी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून मुकावे लागत आहे. रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर 1 ते 2 मिनिट उशिराने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.सीबीएसईतर्फे रविवारी (दि.22) शहातील विविध परीक्षा केंद्रांवर नेट परीक्षा घेतली जाणार होती. राज्यातील विविध भागातून विद्यार्थी पुण्यात परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यातील काही विद्यार्थी सकाळी 9 वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर पोहोचत होते. पहिला पेपर 9.30 वाजता सुरू होणार होता. सर्व विद्यार्थ्यांनी त्यापूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक होते. परंतु जळगाव, लातूर, सातारा या जिल्ह्यांसह पुणे शहरातील व ग्रामीण भागातून येणा-या काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास 1 ते 2 तास तर काहींना 5 ते 10 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे शिवाजीनगर येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथील परीक्षा केंद्रांच्या प्रमुखांनी काही विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. तसेच बाणेरच्या आॅर्चिड इंटरनॅशनल स्कूल येथील परीक्षा केंद्रावर जळगाव येथील जितेंद्र पाटील या अंध विद्यार्थ्याला 2 मिनिटांसाठी परीक्षा केंद्राबाहेर उभे केले.सतीश येलकर म्हणाले, पॉलिटेक्निक कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर मी वेळेत पोहोचले होतो. प्रवेशद्वारातून आत जाऊन मी परीक्षा हॉलमध्ये गेलो.परंतु सुपरव्हायजरने मला परीक्षेस बसू दिले नाही. त्यामुळे मी परीक्षा केंद्राच्या प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो. ते नाष्टा होते. त्यात 5 ते 10 मिनिटे गेली. त्यानंतर परीक्षा केंद्र प्रमुखांनीही उशीर झाल्याचे सांगत बाहेर जाण्यास सांगितले. तसेच परीक्षेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देणार असल्याची धमकी दिली. परीक्षा केंद्राबाहेर चार विद्यार्थी उभे होते. माझ्यासह प्रवीण गायकवाड, कोमल कोळी, अमरदीप गुरमे या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच घरी परतावे लागले.-------------------------------जितेंद्र पाटील या अंध विद्यार्थ्याने सांगितले, मी बाणेर परिसरातील आॅर्चिड इंटरनॅशनल स्कूल येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वेळेत पोहोचलो होतो. परीक्षा केंद्रात एका पेक्षा अधिक प्रवेशद्वार होते. मी ज्या प्रवेशद्वारातून आत चाललो तेथे मला थांबवले आणि दुस-या प्रवेशद्वारातून जाण्यास सांगितले. त्यामुळे मला 2 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर मला परीक्षेस बसू दिले नाही.