जळगाव : ‘नो डिमांड; नो कम्प्लेंट’ अशी मैत्रीची सुंदर व्याख्या केली जाते. निसर्गाचेही काहीसे असेच आहे. निसर्ग कळत नकळत आपल्याला अनेक गोष्टी देतच असतो. त्या तुलनेत आपण निसर्गाला काहीही देत नाही. निसर्गदेखील आपला एक प्रकारचा उत्तम मित्र आहे. त्याचे ऋण फेडता यावे, या उद्देशाने मू.जे. महाविद्यालयाच्या मुलींचे (शहर) वसतिगृहातील विद्यार्थिनींनी रविवारी अनोखा ‘फें्रडशीप डे’ साजरा केला. फें्रडशीप डेनिमित्त या विद्यार्थिनींनी निसर्गाशी मैत्री केली. आता यापुढे नियमित वृक्ष व फुलांच्या झाडांची निगा राखणे, परिसर स्वच्छता करणे या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा विडा उचलला.केसीई सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालयाच्यावतीने उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थिनींसाठी जिल्हापेठ परिसरात मुलींचे (शहर) वसतिगृह चालवले जाते. याठिकाणी अनेक विद्यार्थिनी राहतात. या विद्यार्थिनींनी यंदाचा फें्रडशीप डे अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. निसर्ग हादेखील आपला एक प्रकारचा मित्र आहे. म्हणून त्याच्या सहवासात श्रमदान करण्याचे विद्यार्थिनींनी ठरवले. त्यानुसार, रविवारी सकाळी ७ वाजेपासून या विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या आवारात स्वच्छता करणे, आवारातील वृक्ष व फुलांच्या झाडांची निगा राखणे, परसबाग तयार करणे अशी कामे केली.
जळगावात विद्यार्थिनींची निसर्गाशी ‘फ्रेंडशीप’!
By admin | Published: August 07, 2016 10:12 PM