मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) आहे. या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. परीक्षेला मुंबईतून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी बसले होते. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या १६,३०७ आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा होती. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी होती. १ ते २२ मार्चला झालेल्या परीक्षेसाठी ९९९ केंद्र संचालक तर ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंर्बत मिळून ७५ परिरक्षक नियुक्त केले होते.
निकालासाठी संकेतस्थळ
www.mahresult.nic.inwww.sscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.com