मुंबई : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सर्व शाळांमध्ये प्रसारित करण्यात आले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले. मात्र देशातील इतर विद्याथ्र्याप्रमाणो राज्यातील विद्याथ्र्याना पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात न आल्याने विद्याथ्र्यानी नाराजी व्यक्त केली. शिक्षक दिनी शिक्षकांसाठी कोणतीच घोषणा न झाल्याने शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रलयाने शिक्षक दिनी पंतप्रधानांचे भाषण दाखविण्याचे आदेश राज्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 3 ते 4.45 या वेळेत पंतप्रधानांचे भाषण प्रसारित करण्यात आले. भाषणाच्या सक्तीचा पेच सुटल्याने अनेक शाळांनी भाषण दाखविण्याची तयारी केली. महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळांमध्ये भाषण दाखविण्यात आले. परंतु सकाळच्या सत्रतील विद्याथ्र्याना शाळेत भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्यासाठी भाषणाचे पुनप्र्रक्षेपण दाखविण्याचा निर्णय काही शाळांनी घेतला आहे.
पंतप्रधान विद्याथ्र्याशी संवाद साधणार असल्याने विद्याथ्र्यामध्ये प्रचंड उत्सुकता होती. शाळांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून मोदी यांचे भाषण दाखविण्यात येणार होते. परंतु इंटरनेटमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक शाळांमध्ये विद्याथ्र्याचा हिरमोड झाला. विद्याथ्र्याना उद्देशून भाषण केल्यानंतर मोदी यांनी विद्याथ्र्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, यासाठी निवडक राज्यांनाच प्राधान्य दिल्याने मुंबईतील विद्याथ्र्याची साफ निराशा झाली. इतर राज्यांतील मुले प्रश्न विचारत असताना आपल्यालाही प्रश्न विचारण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा मुंबईतील बहुतांश शाळांतील विद्याथ्र्याना होती. मात्र, राज्यातील एकाही विद्याथ्र्याला ही संधी न मिळाल्याने विद्याथ्र्याची निराशा झाली. शिक्षक दिनी पंतप्रधान शिक्षण क्षेत्रसाठी नवीन घोषणा करतील, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, पंतप्रधानांनी हिरमोड केल्याने शिक्षकांनी भाषणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
2500 रुपयांचा अपमानजनक पगार दिल्यानंतर कोण शिक्षक बनण्यास तयार होईल? शिक्षक दिनी पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल देशाला मोठी उत्सुकता होती. पण शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे. तर महागलेले शिक्षण घ्यायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर पालक आणि विद्याथ्र्याना मिळाले नाही.
- कपिल पाटील, आमदार
पंतप्रधानांचे भाषण खूप चांगले झाले. विद्याथ्र्यानाही यातून प्रेरणा मिळाली. परंतु शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रच्या विकासासाठी आणि प्रत्येक विद्याथ्र्याला शाळेत आणण्यासाठी नव्या योजनेची घोषणा करायला हवी होती. त्यांनी भाषणातून देशप्रेमाची भावना निर्माण केली. पण आणखी सैनिकी शाळा सुरू करता येतील का? याबाबत कोणतेच मत व्यक्त केले नाही. पंतप्रधानांच्या भाषणाप्रमाणोच राज्यातील मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्र्यांनीही विद्याथ्र्याशी संवाद साधला पाहिजे.
- प्रशांत रेडीज, महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते
पंतप्रधानांनी भाषणातून चांगले शिक्षक मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. परंतु सध्या ध्येयाने काम करणारे शिक्षकही मोठय़ा प्रमाणावर आहेत. भारतात शिक्षणावर खर्च कमी होत असून तो वाढविणो गरजेचे आहे. तसेच तळागाळातील विद्याथ्र्याला चांगले शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे.
- उज्जवला घारे, मुख्याध्यापिका, गोपालजी हेमराज हायस्कूल, बोरीवली