नांदेड : येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तोंडावर सिगारेटचा धूर फेकला. रॅगिंगला विरोध केल्याने मारहाण केल्याची तक्रार द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. वजिराबाद पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली आहे.जोरदार मार लागल्याने काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. चौकशीसाठी हे प्रकरण आता महाविद्यालयातील अॅन्टी रॅगिंग समितीकडे देण्यात आले आहे़ आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृहात १६ खोल्यांमध्ये ४८ विद्यार्थी राहतात़ काही शहरात राहतात. बीएएमएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सीनिअर्ससाठी २५ जानेवारीला पार्टी ठेवली होती़ त्यासाठी महाविद्यालयाकडून परवानगीही घेतली होती. मात्र त्याआधीच मंगळवारी रात्री वसतिगृहातील सीनिअर्सनी सोमेश कॉलनीतील नऊ विद्यार्थ्यांना पार्टीची तयारी करण्यासाठी वसतिगृहावर बोलावले. तेव्हा एका खोलीत ११ विद्यार्थी दारू पित होते. त्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला़ काहींना जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे दोन विद्यार्थ्यांना ओकाºया झाल्या़ रॅगिंगला विरोध करणाºयांना सिनिअर्सनी मारहाण केल्याने विद्यार्थ्यांनी रात्रीच वजिराबाद पोलीस ठाणे गाठले़ त्यानंतर पोलीस महाविद्यालयात गेले. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी चौकशी केली.११ सदस्यीय समितीरॅगिंगच्या चौकशीसाठी महाविद्यालयाने ११ सदस्यीय समिती नेमली आहे. नऊ विद्यार्थ्यांच्या तक्रारी समितीकडे सोपविल्या आहेत़ समितीच्या अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ़ श्यामकुंवर यांनी सांगितले़आवारात दारूच्या बाटल्यामहाविद्यालयाच्या पाठीमागेच विद्यार्थ्यांचे मोडकळीस आलेले वसतिगृह आहे़ वसतिगृह आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. विशेष म्हणजे वसतिगृहासाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे बाहेरची मुले येथे येऊन पार्ट्या करतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले़
नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना दारू पाजण्याचा प्रयत्न, आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग; सीनिअर्सकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:14 AM