शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

उजनीच्या पाणलोटात विद्यार्थी बुडाला

By admin | Published: March 22, 2016 1:47 AM

उजनी पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. २०) दुपारी पोहताना बुडालेल्या, इंदापूरच्या १५ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा आज उशिरापर्यंत तपास लागला नाही

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. २०) दुपारी पोहताना बुडालेल्या, इंदापूरच्या १५ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा आज उशिरापर्यंत तपास लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे लोक उद्या सकाळी येतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ओंकार संजय सरवणकर (वय १५, रा. अलंकार बिल्डिंग, नेहरू चौक, इंदापूर) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याचे वडील संजय यशवंत सरवणकर यांनी पोलिसांना दिली. याविषयी सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ओंकार खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला, तो परतलाच नाही. त्यानंतर त्याचे मित्र रिझवान रफिक खान, अमन सादिक मोमीन, सैफुल मौला बागवान, वसीम अब्दुल नदाफ (सर्व रा. बागवान गल्ली, इंदापूर) यांनी सांगितले की, रविवारी दुपारी नारळ शोधण्यासाठी ओंकारसह हे सर्व जण शहा या गावी गेले होते. गावानजीक पाणलोट क्षेत्राजवळ ते सारे गेले. तेथे ओंकार कपडे व सँडल काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाणी वेगात होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे पाहताच रिझवान त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला; मात्र घाबरलेल्या ओंकारने त्यालाच पाण्यात ओढल्याने दोघे बुडू लागले. मुलांनी आरडाओरडा केला. तो ऐकून तेथे आलेल्या मच्छीमाराने रिझवानला पाण्याबाहेर ओढून काढले. तेवढ्या कालावधीत ओंकार पाण्यात बुडाला. तो दिसेनासा झाला. ही माहिती मुलांकडून समजल्यानंतर ओंकारच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे ओंकारचे कपडे व सँडल आढळून आले. मच्छीमार व पोहणाऱ्यांनी शोध घेतला. रात्रभर तेथे थांबूनही ओंकारचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर सकाळी त्याच्या वडिलांनी पोलिसांना खबर दिली. शोध घेण्याची विनंती केली. आज दिवसभर शोधकार्य चालू होते. रात्री उशिरापर्यंत ओंकार सापडला नाही. उद्या सकाळी पुन्हा शोध घेतील, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. (वार्ताहर)