मुंबई : आगीच्या दुर्घटनेत गोकूळ निवास कोसळल्यामुळे चौकशीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत़ त्यामुळे आगीमागचे कारण शोधून काढण्यासाठी या समितीची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे़ ही त्रिसदस्य उपसमिती पुढील आठवड्याभरात आगीचे मूळ शोधून काढणार आहे़काळबादेवी येथील चार मजली इमारत आग लागून नंतर कोसळली़ या इमारतीचा ढिगारा उपसून काढण्यात आला असून, चौकशीसाठी घटनास्थळी काहीच उरलेले नाही़ त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) संजय मुखर्जी यांनी उपसमितीची स्थापन केली आहे़ या समितीची पहिली बैठक सोमवारी पार पडली़ त्यानुसार प्राथमिक अहवाल तीन दिवसांमध्ये अपेक्षित आहे़महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक एऩव्ही़ देशमुख, अग्निशमन दलाचे प्रभारी प्रमुख प्रभात रहांदळे आणि प्रमुख अभियंता (यांत्रिकी आणि विद्युतीकरण) यांचा समावेश या उपसमितीमध्ये आहे़ ही समिती घटनास्थळाची पाहणी, प्रथमदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे आठवड्याभरात आपला अहवाल सादर करणार असल्याचे, अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
आगीचे मूळ शोधण्यासाठी उपसमिती
By admin | Published: May 13, 2015 1:55 AM