शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

भुजबळांकडून भलतीच कागदपत्रे सादर

By admin | Published: August 23, 2015 1:58 AM

महाराष्ट्र सदन आणि कलिना ग्रंथालय घोटाळा प्रकरणी लाचलुचपतविरोधी विभाग (एसीबी) आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असले तरी इतर घोटाळ्यांशी संबंधित कागदपत्रे

मुंबई : महाराष्ट्र सदन आणि कलिना ग्रंथालय घोटाळा प्रकरणी लाचलुचपतविरोधी विभाग (एसीबी) आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असले तरी इतर घोटाळ्यांशी संबंधित कागदपत्रे छगन भुजबळ यांच्याकडून मिळविण्यात एसीबीला संघर्ष करावा लागत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित अन्य आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यात संबंधित कागदपत्रे न देता भुजबळ नको ती कागदपत्रे देत आहेत, असे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. नाशिकमध्ये बॉलीवूडमधील मंडळीच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाशी संबंधित कागदपत्रे मागितली असता भुजबळांनी या कार्यक्रमाचे पोस्टर्स आणि सीडी पाठविल्या, असे या अधिकाऱ्याने उदाहरण देत सांगितले. जनहित याचिकेत करण्यात आलेल्या तक्रारींच्या चौकशीबाबत काय प्रगती झाली, असे विचारले असता या अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी आणि तपास (अन्वेषण) यात फरक आहे. अन्वेषणात आम्ही आरोपीला कागदपत्रे सादर करण्यास सांगतो. ती मिळाली नाही, तर छापे टाकून ती मिळवितो. भुजबळ जी कागदपत्रे देत आहेत, ती चौकशीच्या दृष्टीने गैरलागू आहेत. छगन भुजबळ पब्लिक वेल्फेअर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाशी संबंधित कागदपत्रे मागितली असता त्यांनी पोस्टर्स आणि सीडी पाठविली.अंजली दमानिया यांच्या जनहित याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एसीबी आणि अंमलबजावणी संचालनालयाला भुजबळांविरुद्ध करण्यात आलेल्या ११ आरोपांच्या चौकशीसाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यापैकी दोन आरोप एकत्र केल्याने आरोपांची संख्या ९ झाली. नऊपैकी दोन प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पब्लिक ट्रस्टच्या खात्यातून कलाकारांना मोबदलाभुजबळ यांनी २०१० आणि २०११ दरम्यान नाशिक महोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी एका इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीला आणि कलाकारांना पब्लिक ट्रस्टच्या खात्यातून मोबादला दिला. सेलिना जेटली यांना ४.५ लाख, साधना यांना ३.६ लाख, डिनो मॉरिया यांना ४.५ लाख अािण लारा दत्ताला सर्वाधिक १६.२० लाख रुपये या महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल मोजण्यात आले. याशिवाय गायक अभिजित सावंतला ४५ हजार, नेहा धुपियाला ४.९ लाख आणि सोनू निगमला ४.५ लाख रुपये देण्यात आले.