शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करा

By admin | Published: September 07, 2015 1:44 AM

भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी सहभागी साधू, संन्याशांचे वर्तन व त्यांच्या ‘लीलां’मुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा वादग्रस्त बनू लागला आहे.

जमीर काझी, मुंबईभाविकांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी सहभागी साधू, संन्याशांचे वर्तन व त्यांच्या ‘लीलां’मुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा वादग्रस्त बनू लागला आहे. सध्या साधुग्राममध्ये मध्यरात्रीपर्यंत मिरवणुका काढून हुल्लडबाजी करणाऱ्या आखाड्यांना प्रतिबंध न केल्यास हिंसक घटना घडू शकते़ त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याची सूचना असणारा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) नाशिक पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या शाहीस्नानावेळी मध्यरात्री तीनपर्यंत आखाड्यांच्या मिरवणुका सुरू होत्या़ त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याचे या अहवालात नमूद केले आहे. मिरवणुकांतील सहभागी दोन आखाड्यांतील साधू व भक्तांमध्येच वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत होण्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाने वर्तविली आहे. त्याबाबत स्थानिक पोलिसांनी खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आल्याचे एसआयडीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. दर १२ वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला यंदा १४ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. देशभरातील वैष्णव व शैव पंथीय साधंूच्या आखाड्यांनी साधुग्राम तुडुंब भरले आहे. पहिल्या पर्वणीला किमान ६० ते ८० लाखांवर भक्त येण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली. नाशिक पोलिसांच्या पथकांबरोबरच राज्य गुप्तवार्ता विभागातील विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक कुंभमेळ्यातील सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. २९ आॅगस्टला झालेल्या पहिल्या शाहीस्नानावेळी आखाड्यांनी काढलेल्या मिरवणुकांमुळे काहीसे गोंधळाचे वातावरण होते. कुंभमेळ्यामध्ये १३ सप्टेंबरला दुसरे शाहीस्नान होईल. १८ व २५ सप्टेंबरला अनुक्रमे तिसरे शाही व वामन द्वादशी स्नान होणार आहे. यावेळी आखाड्यांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यावेळी साधू व त्यांच्या भक्तांतील संभाव्य वादविवाद टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, असे सुचविण्यात आल्याचे एसआयडीतील विशेष महानिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.कुंभमेळ्यातील आखाडे : वैष्णव पंथीय आखाडे (नाशिक), निर्मोही अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा, दिगंबर अनी आखाडा, शैव पंथीय आखाडे (त्र्यंबकेश्वर), शंभू पंच दशनाम जुना आखाडा, शंभू पंच दशनाम आवाहन आखाडा, पंचाग्नी आखाडा, तपोनिधी निरंजनी आखाडा, तपोनिधी आनंद आखाडा, पंचायती आखाडा महानिर्वाणी, पंचायती आठल आखाडा, बडा उदासीन आखाडा निर्वाण, नया उदासीन आखाडा निर्वाण व पंचायती निर्मल आखाडा