ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोनवरून माझ्या जीवाला धोका आहे, असे सांगतात. मात्र, याची तक्रार न देता, ती माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवली. तसेच माहिती लपवणे, हा कायदेशीररीत्या गुन्हा असल्याने मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जाहीर सभेत केली. जर पालिकेचा आयुक्त सुरक्षित नसेल, तर जनता कशी सुरक्षित राहील, असा सवाल करत अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे आणि सुषमा स्वराज यांची भाजपआता राहिली नसून ती गुंडांची झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.ठाण्यातील किसननगर येथे बुधवारी आघाडीची जाहीर सभा पार पडली. या वेळी बोलताना, मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून ती मिळवण्यासा शिवसेना -भाजप कोंबड्यांप्रमाणे झुंजत आहेत. एकमेकांची औकात पाहण्यापासून ती काढताना त्यांना संस्कृतीचा विसर पडला आहे. काँग्रेस व आघाडीच्या योजनांची नावे बदलून हे सरकार दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करायचे काम करीत आहे. त्यांना तशी सवय आहे,, असा आरोप नाव न घेता केंद्रातील भाजप सरकारवर केला. जयस्वाल यांना मी ठाण्यात पाठवले, असे म्हणणारे मुख्यमंत्री यांच्या कंपनीत ते काम करतात का, असा सवाल करून मुख्यमंत्र्यांना आयुक्तांनी त्यांना येणाऱ्या धमकीची दिलेली माहिती नक्की खरी आहे का, असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांकडे पोलीस खाते आहे. तसेच ते वकील आहेत, तरी ही माहिती का लपवली. प्रत्येक जिल्ह्यातील गुंड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करतात, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)
...मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा
By admin | Published: February 16, 2017 4:43 AM