शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पाणी अडवा पाणी जिरवा

By admin | Published: June 19, 2016 1:46 AM

जर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात

- सत्यजीत भटकळजर समाजात फूट असेल, गावात जर भांडणे असतील तर ते भांडेही गळकेच असेल नि पाणी त्यात जमा होणार नाही. मात्र गाव समाज जर एकसंध असेल तर ते भांडेही अखंड असून त्यात पावसाचे पाणी जमा होत राहील. हे समजवण्यासाठी खेळ आणि नाटक या माध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आला. ज्यामुळे कंटाळवाणी भाषणे झाली नाहीत आणि अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात प्रशिक्षण पार पडले.शिबिरादरम्यान या पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना हडळफच्या माध्यमातून देण्यात आले.पाणी अडवा पाणी जिरवा किंवा माती अडवा पाणी जिरवा या घोषणा बऱ्याच जुन्या आहेत. मग प्रश्न असा उद्भवतो की या घोषणांवर अंमलबजावणी का झाली नाही. पाणी अडवून का जिरवले गेले नाही? एक प्रमुख कारण आहे ते हे की पाणी अडवण्यासाठी, जिरवण्यासाठी गावात एकी होणे खूप गरजेचे आहे.नेहमीच आपण पाणी जिरवण्याऐवजी एकमेकांना जिरवण्यात अधिक रस घेतला. आपण एकमेकांना पाण्यात पाहत राहिलो आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही निवळ घोषणा म्हणून राहिली. ही परिस्थिती बदलावी, गावात एकी निर्माण होऊन पाणलोट विकासाचे कामे व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा आधार होता प्रशिक्षण. भाग घेणाऱ्या प्रत्येक गावाला ५ ग्रामस्थ प्रशिक्षणाला पाठविणे बंधनकारक होते. प्रशिक्षणाचे दोन प्रमुख भाग होते. पहिला भाग होता तो तांत्रिक प्रशिक्षणाचा - ज्यात पाणलोट विकासाचे विज्ञान शिकवण्यात आले. पाणी अडवा नि जिरवा सांगणे सोपे आहे परंतु ते नेमके कसे करावे याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. WOTR नावाची संस्था या क्षेत्रात तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून काम करीत आहे. WOTR च्या इंजिनीअर्सनी ही जबाबदारी सांभाळली.हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल होते. त्यात लेक्चरबाजी अजिबात नव्हती. निरीक्षणातून, कृतीतूनच शिकायचे होते. प्रशिक्षणासाठी आम्ही अशा गावांची निवड केली होती जिथे पाऊस अत्यंत कमी पडला होता तरी ती गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध होती. कारण त्या गावांनी पाणलोट विकासाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केली होती. पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थी यजमान गावाची शिवार फेरी करीत असत. त्या शिवारफेरीत त्यांना विहिरीतील पाणी दिसे, मे महिन्यात चालणारी शेती दिसे, गावातील समृद्धी दिसे. त्याचबरोबर यजमान गावात झालेले जलसंधारणाचे लहान मोठे उपचारही दिसत असतात. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. कमी पावसातही पाणलोट विकासामुळे गाव पाणीदार असू शकते याबद्दल त्यांची खात्री पटत असे. मग पाणलोट विकासाचे उपचार कोणकोणते आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते उपचार करायचे आणि प्रत्येक उपचार कसा करतात हे पुढच्या तीन दिवसांत शिकवले जात असे. काही उपचार ते स्वत: शिबिरादरम्यान निर्माण करत असत. तर बाकी उपचार कसे करतात ते फिल्म्स आणि प्रश्नोत्तरामार्फत शिकवले जात असे. प्रशिक्षणाचा एक भाग तांत्रिक होता, तर दुसरा भाग होता सामाजिक. गाव समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्व असे समजावले जात असे. थोडक्यात काय तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ म्हणजे काय करायचे? एवढेच न सांगता ते कसे करायचे यावर आम्ही सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून भर दिला. जवळजवळ ८०० प्रशिक्षणार्थी आपापल्या गावी गेले. ते प्रशिक्षण काळात जे जे शिकले ते त्यांनी आपापल्या ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे प्रचंड काम केले. नियोजनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व कामे ही ग्रामास्थांनीच केली. शेतकरीच इंजिनीअर होता, शेतकरीच श्रमकरी होता. पाऊस येईल तेव्हा मातीही अडेल, पाणीही जिरेल. आणि याचे पूर्ण श्रेय प्रशिक्षित होऊन आलेल्या शेतकऱ्याचेच असेल.

(जून महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)