नवी दिल्ली : बाजार नियामक ‘सेबी’कडे २00 कोटी रुपये जमा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सहाराप्रमुख सुब्रत रॉय यांचा पॅरोलचा अवधी ११ जुलैपर्यंत वाढविला. न्यायालयाने रॉय यांना दिलेला हा मोठा दिलासा आहे.सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने रॉय आणि सहारा समूहाचे संचालक अशोक रॉय चौधरी यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी व्यक्तिश: शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या दोघांनाही ६ मे रोजी चार आठवड्यांसाठी पॅरोलवर मुक्त करण्यात आले होते. या पीठात न्या. ए.आर. दवे आणि न्या. ए.के. सिकरी यांचाही समावेश आहे.बुधवारी सुब्रत रॉय यांचा पॅरोल अवधी वाढविताना न्यायमूर्ती म्हणाले की, २00 कोटी रुपये ‘सेबी’कडे जमा करण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर विचार करून त्यांना पॅरोलचा अवधी ११ जुलैपर्यंत वाढवून देत आहोत. मात्र, याबाबत आपण प्रामाणिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी व्यक्तिश: शपथपत्र दाखल केले पाहिजे.
सुब्रत रॉय यांचा पॅरोल वाढवला
By admin | Published: May 12, 2016 3:35 AM