मुंबई - राज्यात रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच पंतप्रधानांनादेखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे. (Success in CM's pursuit, increased supply of remdesivir in the state; The Chief Minister thanked the Prime Minister.)
आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिव्हिर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर पिलं, 7 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाचा हाहाकार -सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सध्या आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह काही राज्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ६७६ रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,९४,४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३४,६८,६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३९२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे.