मुंबई : सायन रुग्णालयात शरीर जोडल्या गेलेल्या जुळ्या मुलींवर शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे करण्यात आले. जन्मल्यापासून सहाव्या दिवशी शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे करण्यात आले. आता दोघींची प्रकृती स्थिर आहे. चेंबूर येथील योगिता रिथाडिया (२८) यांनी १० जून रोजी जुळ््या मुलींना जन्म दिला. या जुळ््या मुली पोटाच्या भागात जोडलेल्या होत्या. यामुळे या मुलींचे यकृत जोडले गेले होते. योगिताचे नाव राजावाडी रुग्णालयात घातले होते. योगिताच्या सोनोग्राफीमध्ये या मुली जोडल्या गेल्या असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर राजावाडी रुग्णालयाने तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. सातव्या महिन्यात या जुळ््या मुलींचा जन्म झाला. जन्माच्या वेळी दोघींचे वजन मिळून ४.९ किलो होते. जन्माला आल्यावर दोन्ही मुली रडल्या. त्यांना श्वसनाचा कोणताही त्रास नसल्याने आॅक्सिजन लावण्याची गरज पडली नाही. सहा दिवसांनी म्हणजे १६ जूनला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताच्या पेशी वेगळ््या करण्यात आल्या. त्यावेळी जास्त रक्तस्राव झाला नाही. त्वचा ही व्यवस्थित बंद करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरही त्या दोघींची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोणत्याही सपोर्ट सिस्टीमची गरज लागली नाही. दोन्ही मुली व्यवस्थित खात असून नैसर्गिक विधी योग्य पद्धतीने होत असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी सांगितले.
सयामी जुळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Published: June 25, 2015 1:34 AM