१३ मे २०१६महसूल मंत्रालयात अडलेले जमिनीच्या मंजुरीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गजानन उर्फ गजमल लक्ष्मण पाटील याला मंत्रालयाच्या गेटवर अटक . तक्रारीमध्ये खडसे यांचे ओएसडी उन्मेश महाजन यांचे नाव नमूद.१६ मे २०१६लाच प्रकरणाच्या चौकशीत राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस१७ मे २०१६खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन या आलिशान कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप. २० मे २०१६ आरोपांबाबत खुलासा करून माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, अशी नोटीस खडसे यांनी अंजली दमानिया यांना बजावली.२१ मे २०१६ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या दूरध्वनीवरून खडसे यांच्या मोबाइलवर कॉल आले होते, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला. २२ मे २०१६आम्ही ‘त्या’ मोबाइल क्रमांकाचे सर्व तपशील तपासले. त्यात सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत या क्रमांकावर कोणताही कॉल आला नाही. मुंबईचे पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली क्लीन चिट२३ मे २०१६भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रुपयांची ३ एकर जागा खडसे यांनी पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला. २९ मे २०१६खडसे आणि कुख्यात ‘डॉन’ दाऊद यांच्यातील कथित फोनकॉल प्रकरणाची सीबीआयमार्फत जलदगतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हॅकर मनिष भंगाळे याने उच्च न्यायालयात केली.३० मे २०१६खडसे यांना तत्काळ मंत्रिपदावरून हटविले पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली, तर तापी पाटबंधारे महामंडळाच्या कुऱ्हा वढोदा उपसा योजना व जिगाव प्रकल्पाच्या कामात कंत्राटदाराला जाणीवपूर्वक अतिरिक्त मोबदला दिला, तसेच सातोड येथील जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार करून कुटुंबीयांच्या नावे कोट्यवधीची मालमत्ता मिळविली आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.१ जून २०१६भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांनी न दिल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने दिल्लीत केली.२ जून २०१६मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसेंवरील आरोपांबाबतचा आपला अहवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सादर केला, तर खडसे यांनी राजीनामा द्यावा, अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकून त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले.३ जून २०१६पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार, दानवे- खडसे यांच्यात चर्चा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केली खडसेंशी चर्चा.४ जून २०१६महसूलमंत्री खडसे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला.
अशा घडल्या घडामोडी
By admin | Published: June 05, 2016 12:39 AM