शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राज्यात विजेच्या मागणीत अचानक घट, कारखान्यांना सुट्या, वीजनिर्मिती संच बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 8:41 AM

घरगुती, कृषी, व्यावसायिक व इंडस्ट्रियल ग्राहकांचा विचार करता घरगुती व कृषीसाठी विजेचा वापर करणारे ८० टक्के ग्राहक आहेत, तर व्यावसायिक आणि उद्योगांसाठी २० टक्के वापर केला जातो.

- शरदचंद्र खैरनार

एकलहरे (जि. नाशिक) : दिवाळीमुळे सलग असलेल्या सुट्या व वातावरणात वाढणाऱ्या गारव्यामुळे  राज्यात विजेची मागणी कमी झाली असून, त्यामुळे महानिर्मितीचे बहुतेक संच बंद ठेवण्याची वेळ आली आहे.  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात २० हजार मेगावॅटपर्यंत गेलेली विजेची मागणी अचानक घटल्यामुळे राज्यात महानिर्मितीचे ८ संच रिझर्व्ह शटडाऊन खाली बंद ठेवण्यात आले आहेत. 

घरगुती, कृषी, व्यावसायिक व इंडस्ट्रियल ग्राहकांचा विचार करता घरगुती व कृषीसाठी विजेचा वापर करणारे ८० टक्के ग्राहक आहेत, तर व्यावसायिक आणि उद्योगांसाठी २० टक्के वापर केला जातो. या २० टक्के ग्राहकांकडूनच ८० टक्के वीज बिलापोटी महसूल मिळतो. त्यामुळे ८० टक्के महसूल देणारे व्यवसाय, कारखाने, कार्यालये दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे बंद असल्याने २५ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजेदरम्यान विजेची मागणी कमी होऊन १४,९७८ मेगावॅटपर्यंत आली.

महानिर्मितीच्या नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ यासह उरण गॅस, हायड्रो, सोलर, वायू यांची मिळून ३,५२० मेगावॅट वीजनिर्मिती आहे. खासगी जिंदाल, अदानी, धारिवाल, एस.डब्ल्यू.पी.जी.एल. व इतरांची मिळून ५,५३६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.

हे संच आहेत बंदमहानिर्मितीच्या राज्यातील २७ संचांपैकी पारस येथील एक संच वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी, नाशिकचा एक संच कोळसा डायव्हर्ट केल्याने, कोराडी येथील एक संच बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद आहेत, तर भुसावळचा एक, परळीचे तीन व चंद्रपूरचे चार संच रिझर्व्ह शटडाऊनमुळे बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्रांतील उत्पादन असेमंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान नाशिकची क्षमता ६३० मेगावॅटपैकी दोन संच सुरू असल्याने उत्पादन २१७, कोराडीला २४०० क्षमतेपैकी उत्पादन ८०६, खापरखेडा येथे १३४० क्षमता असून ५६२,  पारस ५०० क्षमता असून १२६, परळी ११७० क्षमता असून ५,  चंद्रपूर २९२० क्षमता असून ८२१,  भुसावळ १२१० क्षमता असून ५३६,  उरण ४३२ मेगावॅट क्षमता असून ८७ मेगावॅट वीज उत्पादन सुरू होते.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन