मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनतर आता राजकीय वर्तुळातून याविषयी वेगवेगळ्या प्रतिकिया येत आहे. भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे. राज यांची ईडीकडून होत असलेली चौकशी ही एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाची नसून ती एका व्यवसायाची, असल्याची मुनगंटीवार म्हणाले आहे . एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिकिया वेळी ते बोलत होते .
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणात राज यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. राज यांच्या चौकशीमुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधीपक्षातून होत आहे. तर ही चौकशी एखाद्या पक्षाच्या प्रमुखाची नसून, एका व्यवसायिक म्हणून असणाऱ्या व्यवसाया संबंधित बाबीची असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केली आहे.
चौकशीला बोलवण्यात आले म्हणजे राजकरण आहे. असे म्हणणे योग्य नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची ९ तास चौकशी झाली होती, त्यामुळे चौकशी झाली म्हणजे आरोपी आहेच असे होत नाही. असेही मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे या चौकशीला राजकीय दृष्टीने पाहू नयेत असे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले.