- अरुण बारसकर, सोलापूरहमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. या पट्ट्यातील तब्बल ७० कारखाने यंदा बंद तर ५५ कारखाने कसेबसे सुरू आहेत. दुष्काळाची झळ पश्चिम महाराष्ट्रालाही बसली असून या पट्ट्यातील १७ कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.मागील दोन वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. १९९० च्या दशकापर्यंत पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असलेल्या साखर कारखानदारीने विदर्भ, मराठवाडा व खान्देशातही पाय पसरण्यास सुरुवात केली. मागील वर्षापर्यंत या पट्ट्यातील १९ जिल्ह्णात तब्बल १२५ साखर कारखाने आहेत. यापैकी अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्णात अधिक कारखाने आहेत, परंतु मागील दोन वर्षांत पाऊसमान वरचेवर कमी होत असल्याने कारखान्यांना ऊस मिळेनासा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही १६ कारखाने यावर्षी उसाअभावी बंद आहेत. यामध्ये सोलापूर व सांगलीचे प्रत्येकी चार, कोल्हापूर व साताऱ्याचे प्रत्येकी तीन व पुण्याच्या दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे साखर हंगामावर कमालीचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा ७६० लाख मेट्रिक टनावरच हंगाम आटोपणार असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. बंद कारखाने : औरंगाबाद ५, जालना २, बीड ५, परभणी ४, नांदेड ६, उस्मानाबाद १६ यावर्षी १२५ पैकी ५५ कारखान्यांची धुराडी पेटली असून ७० कारखाने सुरू झाले नाहीतपश्चिम महाराष्ट्रातील १०६ साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी अवघे ७ कारखाने बंद होते यावर्षी १६ कारखाने बंद आहेत.अहमदनगरचे २२ पैकी ४, नाशिकचे ९ पैकी सहा, औरंगाबादचे ९ पैकी ५, जालन्याचे पाचपैकी २, बीडचे १० पैकी ५, परभणीचे ५ पैकी चार, नांदेडचे ८ पैकी ६, उस्मानाबादचे १६ पैकी १२, लातूरचे १२ पैकी ८, यवतमाळचे ४ पैकी ३ साखर कारखाने बंद आहेत.वर्ध्याच्या दोन पैकी एक, भंडाऱ्याच्या दोन पैकी एक, अमरावतीचा एकमेव विदर्भ शुगर, बुलढाण्याचे तीन, जळगावचे ७, नंदूरबारचे तीन, धुळ्याचे दोन साखर कारखाने बंद आहेतमागील वर्षी मराठवाडा, खान्देश व विदर्भातील १२५ कारखान्यांपैकी ८१ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता तर ४४ कारखाने बंद ठेवले होते
विदर्भ, मराठवाड्यातील साखर कारखाने संकटात
By admin | Published: December 04, 2015 2:07 AM