शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

पुढील ऊस हंगामही साखरेचाच : गेल्या वर्षीपेक्षा ऊस क्षेत्रात ८० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 7:38 PM

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन ऊस क्षेत्रात ८० टक्के वाढ झाल्याने, पुढील वर्षे देखील साखरचेच ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

पुणे : पावसाने साखर पेरणी केल्याने यंदाही ऊस क्षेत्रात मोठी वाढ होण्याची चिन्हे  आहेत. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन ऊस क्षेत्रात ८० टक्के वाढ झाल्याने, पुढील वर्षे देखील साखरचेच ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान आणि योग्य पाऊसाची साथ मिळाल्यास पुढील हंगामही विक्रमी साखर उत्पादनाचा ठरेल, असे साखर क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. 

             राज्यात कोल्हापूर आणि पुणे विभागात मिळून ६० ते ६५ टक्के उसाचे उत्पादन होते. यंदाही याच क्षेत्रातील भीमा आणि कृष्णा खोºयात चांगला पाऊस झाला आहे. कृष्णा खोºयातील कोयना, धोम, कण्हेर, वारणावती, राधानगरी, पाटगाव अशी सर्वच महत्त्वाची धरणे भरली आहेत. भीमा खोºयातील खडकवासला साखळीतील वरसगाव, पानशेत, खडकवासला, नीरादेवघर, भाटघर, डिंभे, माणिकडोह, पवना, भामाआसखेड, चासकमान या धरणातील पाणीसाठा चांगला आहे. तसेच सोलापूरची जीवनवाहिनी असलेले उजनी धरणही फुल भरले आहे. त्यामुळे सोलापुरचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. पाऊस चांगला झाल्याने अडसाली उसाची लागवड देखील चांगली झाली आहे. राज्यात उसाचे सरासरी क्षेत्र ९ लाख ४ हजार ९७८ हेक्टर असून, त्यात खोडवा उसाचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असते. यंदाच्या वर्षी ते ५० टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा कोल्हापूर आणि पुणे विभाग या ऊस क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने नवीन उसाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्यावर्षी याच काळात १ लाख १३ हजार २९० हेक्टरवर नवीन उसाची लागवड झाली होती. यंदा त्यात २ लाख ४ हजार ६८ हेक्टर पर्यंत (८० टक्के अधिक) वाढ झाली आहे. 

           गेल्या हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदाच्या हंगामासाठी अतिरिक्त २.६० लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. परिणामी ऊस गाळप हंगामासाठी ९४१.६० लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाºया उसाचे संपूर्ण गाळप व्हावे या साठी नोव्हेंबर ऐवजी १ आॅक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान २०१७-१८ या ऊस गाळप हंगामात ९५२.६२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ९४१ लाख टन ऊस गाळपातून १०६ ते १०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी