शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

साखरेची साठेबाजी रोखली

By admin | Published: January 20, 2016 1:26 AM

साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले.

बारामती : साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. फलटणच्या न्यू फलटण शुगर कारखान्याची साखर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये २,४०५ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करून आता दर वाढल्यावर विक्रीस काढली आहे. व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून विक्रीला काढलेल्या साखरेमुळे साखर कारखान्यांची साखरविक्री होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.आठवडाभरापासून साखरेच्या दरात ३ हजार ते ३,२०० रुपये अशी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उठविण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, साखरेची साठेबाजी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये अत्यल्प भाडेपट्ट्यावर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. काल रात्रीपासूनच बारामतीच्या भिगवण रस्त्यालगतच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून ४१५ मेट्रिक टन साखर चेन्नईला रातोरात पाठविण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, तालुकाध्यक्ष विठ्ठल देवकाते, महेंद्र तावरे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, किशोर मासाळ, अमोल सातकर, चंद्रकांत वाघमोडे, विलास कोकरे आदी याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या वखार गोडाऊनमधून बाहेर जाणारी साखर रोखली. आज सकाळी ९ पासून साखर वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रक थांबविण्यात आले होते. गोडाऊनचे सुपरवायझर एस. पी. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील ईडी अँड एफ कमोडिटीज् प्रा. लि. कंपनीने न्यू फलटण शुगर कारखान्याकडून खरेदी केलेली साखर वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. १,१०५ मेट्रिक टन साखर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. काल रात्री १४२ मेट्रिक टन साखर उचलण्यात आली. रात्री पाठविण्यात आलेली साखर उचलण्याची परवानगी श्रीनाथ ट्रान्सपोर्टला देण्यात आली होती. मात्र, सकाळी आलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडून अधिकृत पत्र मिळाले नव्हते. ५० रुपये दरमहा प्रतिटन भाडेआकारणी वखार महामंडळ करते. त्याप्रमाणे भाडेआकारणी झाली आहे.या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, बारामती शहर पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यात येणार आहे. साखरेच्या साठ्याला निर्बंध नाहीत; मात्र त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)1साखरेचे दर कमी असताना मोठ्या व्यापाऱ्यांनी वायदेबाजाराचा गैरफायदा घेऊन साखर उचलली. आज साखरेचे दर वाढले आहेत. साखरधंदा अडचणीत आहे, असे कारखानदारदेखील ओरडत होते. त्यांनीच व्यापाऱ्यांशी संगनमत करून कमी दराने साखरविक्री केली आहे. 2आता साखरेचे दर वाढलेले असताना व्यापाऱ्यांनी साठेबाजी केलेली साखर विक्रीला काढली आहे. त्याचा आपोआपच कारखान्यांच्या साखरेवर परिणाम होणार आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील यांनी सांगितले.