जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांनी मागील ४00 रुपये व चालू हंगामातील उसाचा दर न जाहीर करता कारखाना सुरू केल्याच्या निषेधार्थ सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले आहे. रविवारी मध्यरात्री आंदोलकांनी २७ वाहने पेटवून कर्नाटक शासनाचा निषेध केला.अथणी, कागवाड, रायबाग, जमखंडी, मुडलगी, चिकोडीसह तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित येऊन बेळगाव-विजापूर महामार्गावर सुमारे सहाशेहून अधिक उसाची वाहने गेल्यातीन दिवसांपासून रोखून धरली आहेत.कर्नाटकातील साखर कारखान्यांनी गतहंगामात २९०० रुपये दर दिला होता. त्यापैकी २५०० रुपये शेतकऱ्यांना आठ ते नऊ महिन्यांनी दिले व उर्वरित ४०० रुपये अद्याप दिलेले नाहीत. तसेच सध्या होऊ घातलेल्या गळीत हंगामातील एफआरपी जाहीर न करता कारखाने सुरू केले आहेत.याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक संघटना यांच्यावतीने कर्नाटक सीमाभागात गेल्या १५ दिवसांपासून ऊस आंदोलन सुरू आहे.१४ नोव्हेंबरला बेळगाव येथे जिल्हाधिकारी डॉ. बोमणहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यामध्ये गत वर्षातील ४00 रुपये देण्याचे १७ नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांंना देण्याचे आदेश दिले होते. हे पैसे न देता कारखानदारांनी कारखाने सुरू केले.त्यामुळे सीमाभागातील शेतकºयांनी ऊसदरप्रश्नी आंदोलन उग्र केलेआहे.आज निघणार तोडगाकर्नाटक सीमाभागातील शेतकºयांनी सुरू केलेल्या ऊसदरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज, मंगळवारी बंगलोर येथे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यामध्ये शेतकरी संघटना व सरकार यांच्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलन पेटले; आंदोलनाचा तिसरा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:01 AM