पुणे : यंदाच्या खरीप हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल १५२० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. कोकणतील रायगड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्णांपैकी केवळ सिंधुदुर्गमध्येच उसाची लागवड होण्यामागे कोल्हापूरमधील साखर कारखान्यांचे भौगोलिक सान्निध्य हेही कारण आहे.राज्यात ८ लाख ८६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होते. राज्यात उसाचे सर्वाधिक १ लाख ३७ हजार २०० हेक्टर क्षेत्र सोलापूर जिल्ह्णात तर त्या खालोखाल १ लाख १५ हजार १०० हेक्टर क्षेत्र कोल्हापूरमध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकाने म्हणजे १ लाख १२०० हेक्टर क्षेत्र नगर जिल्ह्णात आहे.उसासाठी कोकणातील जमीन अनुकूल नसल्याने कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्णात व सिंधुदुर्ग जिल्ह्णात लागवड केली जात नव्हती. सिंधुदुर्ग जिल्ह्णात भूगर्भात पाण्याची पातळी चांगली असल्याने वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी आणि मालवण अशा तालुक्यात उसाची लागवड होऊ लागली. वैभववाडी तालुक्यात यंदा तब्बल साडेसहाशे हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. (प्रतिनिधी)
कोकणातही उसाची लागवड
By admin | Published: August 08, 2015 1:15 AM