प्रकाश पाटील -कोपार्डे (कोल्हापूर)- साखरेचे दर घसरल्याने, कारखान्याचे अर्थकारण कोसळल्याने राज्यात कोल्हापूर जिल्हा वगळता इतरत्र कोठेही उसाला एफआरपीप्रमाणे कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. तरीही कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या १७४ साखर कारखान्यांनी तीन कोटी ८५ लाख ६१ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. १०.६१ एवढ्या सरासरी साखर उताऱ्याने चार कोटी ९ लाख १० हजार क्विंटल साखर तयार केली असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.गेल्यावर्षी जानेवारीपर्यंत १५५ साखर कारखाने सुरू होऊन त्यांनी दोन कोटी ९२ लाख १९ हजार मे. टन उसाचे गाळप केले होते. सरासरी उतारा १०.५४ इतका होता. तीन कोटी सात लाख ९९ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात एक कोटी एक लाख टन ११ हजार क्ंिवटलने वाढ झाली. सरासरी उताऱ्यातही वाढ झाली आहे.कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी ८८ लाख ३२ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. तर एक कोटी चार लाख ३४ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८१ टक्के असून, तो सातही विभागात सर्वाधिक आहे. साखर उत्पादन व गाळपातही पुणे विभाग आघाडीवर आहे. कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता एक लाख ९३ हजार ७५० मे. टन आहे. येथील कारखान्यांनी एक कोटी ५२ लाख ४० हजार मे. टन एवढे गाळप केले आहे. त्यातून एक कोटी ६० लाख ८५ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा मात्र १०.५५ एवढाच आहे.विभागवार कारखान्यांचे गाळप १३ जानेवारीअखेरऊस गाळपसाखर उत्पादनसाखर (लाख मे. टन)(लाख मे. टन)उताराकोल्हापूर८८.३२१०४.३४११.८१पुणे१५२.४०१६०.८५१०.५५अहमदनगर५३.९२५६.०६१०.४४औरंगाबाद३४.०३३१.३५९.२१नांदेड५२.५२५२.४०९.९८अमरावती२.४३२.३१९.४८नागपूर२.००१.७८८.९४
राज्यात चार कोटी नऊ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
By admin | Published: January 16, 2015 10:23 PM