शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:16 AM

यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत एकवीसशे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत एकवीसशे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.या हंगामात शेतकरी संघटनांनी ३५00 रुपये पहिली उचल देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. नंतर २५00 रुपयांपर्यंत माघार घेतली. गंगामाई कारखान्याने २५२५, ज्ञानेश्वरने २५०० तर केदारेश्वरने २५५० रुपये पहिली उचल जाहीर केली. अशोकने २१००, कुकडी, प्रसाद, गणेश, विखे, थोरात, काळे व संजीवनी कारखान्याने २३०० रुपये पहिली उचल जाहीर केली. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा प्रति क्विंटल ४ हजार रुपये भाव ३४०० ते ३२००वर आल्याने २३०० रुपयेच पहिली उचल शक्य आहे. साखरेचा दर ३००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास उसाला भाव देणे अवघड होईल, असे थोरात कारखान्याचे माधवराव कानवडे यांनी स्पष्ट केले होते.देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा भाव २८५० रुपयांवर आला आहे. तो आणखी घसरू शकतो. याबाबत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदारांची बैठक झाली. त्यात साखरेच्या दरातील घसरणीमुळे एफआरपी देणेही शक्य नसल्याने कारखान्यांनी २१०० रुपये भाव द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २५५० च्या आसपास पहिली उचल जाहीर करणाºया कारखान्यांनाही माघार घ्यावी लागली आहे.पैसा देणार कसा?साखरेच्या दरात सतत घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीस नोव्हेंबरमध्ये असलेला साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल साखरेचा भाव आता २८५० रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बँकेचे साखरेचे मूल्यांकन १७५० रुपयांपर्यंत खाली आले आहे. साखरेच्या दरासोबतच मूल्यांकन आणखी कमी होणार आहे. त्यामुळे उसाला पैसा देणार कसा? एफआरपी देणेही अशक्य आहे. त्यामुळे २१०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.- शिवाजीराव नागवडे, अध्यक्ष, राज्य साखर संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी