शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

साखर सांडली की मुंग्या येणारच

By admin | Published: January 04, 2017 1:42 AM

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत

मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत काही बोलल्यास आम्हाला लगेच जुन्या विचारांचे ठरवले जाते. पण पेट्रोलजवळ आग नेली तर आग भडकणारच, साखर सांडली तर मुंग्या जमा होणारच. स्त्री आणि पुरुषांमध्ये एक योग्य अंतर असावे, आजकाल महिला जितक्या तोकड्या कपड्यात वावरतील तितके त्यांना फॅशनेबल आणि आधुनिक समजले जाते. अशा तोकड्या पेहरावांमुळे विनयभंगासारखे प्रकार घडतात, असे विधान आझमी यांनी केले.कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान पोलिसांदेखत अनेक महिलांची छेडछाड काढण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सदर घटनेसाठी पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनाच जबाबदार धरले. पोलिसांची संख्या मर्यादित आहे. पार्टीसाठी आलेल्यांचे पाश्चात्त्य कपडे आणि वागणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढवून घेतला होता. परमेश्वरन यांच्या विधानाचीच अबू आझमी यांनी री ओढली आहे. बंगळुरू येथील घटनेसाठी महिलांनाच जबाबदार धरत भारतीय संस्कृतीपासून दूर गेल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात, असे विधान आझमी यांनी केले. बंगळुरू येथील घटना दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मात्र हल्लीच्या जमान्यात महिला जितके तोकडे कपडे घालेल, जितके अंगप्रदर्शन करेल, तितकेच तिला आधुनिक, फॅशनेबल आणि सुशिक्षित मानले जाते. हे फॅड वाढले आहे. माझी बहीण किंवा मुलगी सूर्यास्तानंतर परपुरुषासोबत थर्टी फर्स्ट साजरा करीत असेल आणि तिच्यासोबत तिचा नवरा किंवा भाऊ नसेल तर हे योग्य नाही,’ असेही आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमी यांच्या या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)आझमींचे वक्तव्य चिथावणीखोर - गोऱ्हे नववर्षाचे स्वागत करणाऱ्या महिलांशी काही समाजकंटक श्वापदाप्रमाणे वागतात. आयटी क्षेत्रातील महानगरांमध्ये अशा घटना घडणे देशाच्या विकासासाठी मारक आहे. त्यातच अबू आझमींसारखी मंडळी महिलांच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करून महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणतात. महिलांवर बंधने आणि पुरुषांना मोकळे रान देणारी चिथावणीखोर वक्तव्ये थांबायला हवीत, असे मत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.