शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

सुहेल शर्मा यांनी केले एव्हरेस्ट सर!

By admin | Published: May 21, 2016 3:16 AM

मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी ठरले एवरेस्ट सर करणारे पहिलेच आयपीएस अधिकारी.

राजेश शेगोकार/बुलडाणा मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून 'एव्हरेस्टवीर' होण्याचा मान मिळविला. ही कामगिरी करणारे शर्मा हे पहिलेच आयपीएस अधिकारी ठरले आहेत.भारतीय पोलीस प्रशासकीय सेवेच्या २0१२च्या तुकडीचे अधिकारी असलेले सुहेल शर्मा हे १४ सप्टेंबर २0१४ रोजी मेहकर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त झाले. विविध टप्पे पार केल्यानंतर २0 मे रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास या चमूने हे शिखर सर केले.सुहेल विरेंद्र शर्मा हे मुळचे अमृतसर येथील रहिवाशी असून १0 दिवसांपूर्वीच त्यांची कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गतवर्षी ते बेस कॅम्पपर्यंत पोहचले होते. परंतु २४ एप्रिल २0१५ रोजी काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे बेस कॅम्पवर हिमकडा कोसळली. या घटनेत शर्मा यांच्या सहकार्‍यांचा मृत्यू झाला तर ते जखमी झाले होते. या घटनेमुळे त्यांना माघारी फिरावे लागले होते. मात्र न डगमगता त्यांनी पुन्हा एव्हरेस्टवारी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आई उमा शर्मा, भाऊ समीर यांनी त्यांचे मनोबल वाढविले. सुहेल शर्मा यांनी मिळविलेले यश हे पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे. ह्यएव्हरेस्टवीरह्ण सुहेल परतल्यावर त्यांचा महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येईल. हा दिवस आमच्या पोलीस दलासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटले तर बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी सुहेल शर्मा यांच्या धाडसी कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस दलाची मान उंचावली असल्याचे म्हटले आहे. या मोहिमेत सहभागी सदस्य१) शेखरबाबू बिचनपल्लई (मोहीम प्रमुख)२) प्रभाकरन एस. (आयएफएस)३) सुहेल शर्मा (आयपीएस)४) राधिका जी.आर.५) भदराही डी.६) बालन शिवरामन७) अशोक मुद्मो८) डॉ. विमल जयस्वाल