वाशिम : शाळेची फी भरण्यास विलंब झाल्यामुळे धास्तावलेल्या एका अकरा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना वाशिमच्या लखाळा भागात गुरुवारी घडली. पायल गजानन लोंढे असे मृत मुलीचे नाव आहे.पायल ही राणी लक्ष्मीबाई शाळेमध्ये सहावीत शिक्षण घेत होती. शुल्क न भरल्यामुळे तिला शाळेत उभे करून फीबाबत विचारणा झाली होती. घरात पैसे नसल्यामुळे गुरुवारी पायलच्या आईने डॉक्टरांकडून उसणे घेऊन पायलची २५० रुपये फी भरली होती, पण याची कल्पना पायलला नव्हती. शुक्रवारी पुन्हा शिक्षक फीबद्दल विचारतील, असे तिला वाटत होते. या तणावातून पायलने घरात गळफास घेतला. घटनेच्यावेळी पायलची आई आणि वडील कामावर गेले होते. आई वाशिम येथे एका खासगी दवाखान्यात काम करते, तर वडील वेटर आहेत. (प्रतिनिधी)
फीसाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या
By admin | Published: September 12, 2015 1:25 AM