व्याळा (अकोला): व्याळा येथील पेठ भागातील रहिवासी जगदेव महादेव सोळंके (५0) यांनी सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व वीज जोडणी न मिळाल्याने कंटाळून १९ नोव्हेंबर रोजी वीष प्राशन करून आत्महत्या केली. जगदेव सोळंके यांच्या नावे दोन हेक्टर सहा आर शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून विंधन विहीर खोदण्यासाठी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. विंधन विहीर बांधल्यानंतर वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज दिला; पण दोन वर्षांपासून त्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही त्यांना बारमाही पिके घेता येत नव्हते. भरीस भर त्यांच्यावर खासगी सावकाराचेदेखील कर्ज होते. याशिवाय तीन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे ते हवालदिल झाले होते. या परिस्थितीला कंटाळून त्यांनी गुरुवारी रात्री वीष घेऊन जीवनयात्रा संपविली.
कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: November 21, 2015 1:45 AM