चिखली (जि. बुलडाणा): दुष्काळी स्थिती आणि सततची नापिकी यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा चढला असताना कुटुंब चालवायचे कसे, या विवंचनेत चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथील तरुण शेतकर्याने आपल्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.तालुक्यातील भोरसा-भोरसी येथील दत्तात्रय पुंडलिक अकाळ (३५) यांच्याकडे चार एकर शेती आहे. यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जात होता. त्यांच्यावर स्टेट बँकेचे ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान, गत तीन वर्षांंंपासून सतत दुष्काळ व नापिकीमुळे त्यांना घरखर्चही भागविणे कठीण झाले होते. अशात बँकेचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत दत्तात्रय अकाळ यांनी सोमवार १८ जुलै रोजी त्यांनी त्यांच्या शेतातील गोठय़ानजीक असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक शेतकरी दत्तात्रय अकाळ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: July 18, 2016 11:48 PM