शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
3
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
4
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
6
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
8
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
9
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
10
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
11
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
12
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
13
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
14
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
16
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
17
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
18
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
19
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
20
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर

पत्नीच्या जाचास कंटाळून पतीची विष पिऊन आत्महत्या

By admin | Published: November 12, 2016 5:13 PM

वडिलांच्या मृत्युस आपली आईच कारणीभूत असल्याची फिर्याद मुलाने दिल्यामुळे आईवर शनिवारी धाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत 
धाड, दि. १२ - सतत मारहाण करुन अपमान करत हीन दर्जाची वागणूक देत असल्याने वडिलांनी विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली. वडिलांच्या मृत्युस आपली आईच कारणीभूत असल्याची फिर्याद मुलाने दिल्यामुळे आईवर शनिवारी धाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
याप्रकरणी धाड पोलिसांनी आरोपी महिलेस अटक केली आहे. सदर घटना धाड पोलीस ठाण्यांतर्गत येणा-या ग्राम मढ येथे घडली. धाडपासून साधारण २० कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम मढ या गावाचे रहिवाशी दिनकर गव्हाणे यांचे शेत हे जाळीचा देव शिवारात असून १८ ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलगा पवन गव्हाणे याने वडिल हरवल्याची फिर्याद पोलिसात दिली होती.
 
दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी दिनकर गव्हाणे यांचे प्रेत त्यांचे शेतालगत डोंगरात आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दिनकर गव्हाणे हे दैनंदिन बक-या चारुन मजुरी करीत होते. तेबुधनेश्वराच्या मंदीरावर राहत पुजा-अर्चा करीत होते. परंतु, त्यांना घरातत्यांची पत्नी विमलबाई सतत अपमानास्पद वागणूक देत मारहाण करीत होती. 
 
हा त्रास सहन न झाल्याने दिनकर गव्हाणे यांनी विषारी औषधी प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती त्यांचा मुलगा पवन दिनकर गव्हाणे यांनी पोलिसांना दिली. याबाबत पवन याने फिर्याद दिली वरुन धाड पोलिसांनी आरोपी विमलबाई गव्हाणे हीला अटक करुन कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले.