नांदेड/हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोलीतील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे सुरू असलेली शेतकरी आत्महत्यांची मालिका अद्याप थांबताना दिसत नाही.नांदेडमधील दरसांगवी येथील उत्तम राठोड यांनी बुधवारी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली़ दुसऱ्या घटनेत निमगाव येथील शंकर गलोड (३२) यांनी गुरुवारी गळफास लावून आत्महत्या केली. तसेच हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे अशोक बळीराम कदम (४०) या शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी विषप्राशन करून आत्महत्या केली. (वार्ताहर)>बुलडाण्यातही आत्महत्यासूलतानपूर (जि. बुलडाणा) येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक किसनराव सुरुसे (५०) यांनी गुरुवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बँकेचे थकलेले कर्ज व मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. ॉ
तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: November 04, 2016 4:58 AM