शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

भिवंडीतच खटला चालणार

By admin | Published: March 11, 2015 2:20 AM

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे विधान करून संघ

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे विधान करून संघ आणि संघ स्वयंसेवकांची बदनामी केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भिवंडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरु असलेला खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.भिवंडी तालुक्यातील सोनाळे या गावी ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेतील भाषणात राहुल गांधी यांनी संघावर गांधी हत्येचा ठपका ठेवला होता. त्याबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश महादेव कुंटे यांनी दाखल केलेल्या फौजदारी फिर्यादीवरून दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर भादंवि कलम ५०० अन्वये बदनामीचा खटला चालविण्याचा आदेश दिला होता व त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले होते. कुंटे यांची फिर्याद व त्यावर दंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करावा, यासाठी राहुल गांधी यांनी केलेली याचिका न्या. एम. एल. टहलियानी यांनी फेटाळली. त्यानंतर, निदान राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयात जातीने हजर न राहण्याची मुभा तरी द्यावी, ही विनंती राहुल यांच्या वकिलांनी केली. त्याबाबत न्यायमूर्तींनी सांगितले की, आधी याचिका प्रलंबित होती तेव्हा तसा आदेश मी दिला होता. आता तसे करण योग्य होणार नाही. त्यासाठी तुम्ही भिवंडी न्यायालयातच अर्ज करावा. (विशेष प्रतिनिधी)