शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

Exclusive: सुजयचं 'हे' वाक्य ऐकून राधाकृष्ण विखे निरुत्तर झाले!

By यदू जोशी | Published: March 11, 2019 5:21 AM

मी स्वत: काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले.

- यदु जोशीमुंबई : ‘मी सुजयला समजावले पण स्वत:च्या राजकीय भवितव्यासाठी त्याने त्याचा निर्णय घेतला. मी स्वत: काँग्रेसमध्येच राहणार आहे’, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले.‘मी सुजयशी भरपूर चर्चा केली. काँग्रेसतर्फे अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची त्याची तीव्र इच्छा होती. राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा आम्ही सर्वपरीने मागून बघितली पण त्यांनी तो सोडली नाही. सुजय मला म्हणाला, ‘तुम्ही विरोधी पक्षनेते असताना एक जागा आपल्या कुटुंबाला मिळवून घेता येत नसेल तर मग मी वेगळा निर्णय घेतो.त्याने असे म्हटल्यावर माझा नाइलाज झाला’, असे विखे म्हणाले.‘सुजय काही विशीतला तरुण नाही. तो आता ३७ वर्षांचा आहे. न्युरोसर्जन आहे. त्याला राजकीय क्षेत्रात करिअर करावेसे वाटते. आता नाही तर कधी निर्णय घ्यायचा हा त्याचा सवाल आहे. त्याने माझे ऐकले नाही. मी माझ्यापुरते मात्र स्पष्टपणे सांगू शकतो की मी भाजपात जाणार नाही. मला तशी ऑफरदेखील कोणी दिलेली नाही. मी विरोधी पक्षनेता आहे आणि पक्षाच्या विजयासाठीच प्रयत्न करेन, असे विखे म्हणाले.उद्या भाजपा प्रवेशडॉ. सुजय विखे हे १२ मार्चला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेणार आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी हा कार्यक्रम होईल. येत्या दोन दिवसात काँग्रेस वा राष्ट्रवादीने कुठलीही समजूत काढली तरी सुजय हे भाजपा प्रवेशाचा निर्णय बदलणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ते अहमदनगरमधून भाजपाचे उमेदवार असतील हे जवळपास नक्की आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस