शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली

By अण्णा नवथर | Published: May 13, 2024 7:58 AM

Sujay Vikhe Loksabha Update: राहुल शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल, शिंदेंनी माणसे बोलवून तिघांना मारहाण केल्याचा आरोप.

अण्णा नवथर अहमदनगर : पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल प्रकाशराव शिंदे यांना रविवारी रात्री वडझिरे परिसरामध्ये पैसे वाटप करताना ग्रामस्थांनी अडवले. त्यावरून तणाव निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 'उत्तरे'तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात... अशा शब्दांत व्हिडीओ ट्विट केले आहेत.

याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे की. राहुल शिंदे हे आपल्या कारमधून पैसे वाटप करत होते. त्यावेळेस मी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी शिंदे यांनी लोक जमवून आपणाला मारहाण केली. साक्षीदार वर्षा पांडुरंग गंधाक्ते, पांडुरंग बबनराव गंधाक्ते हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरून राहुल शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

राहुल शिंदे यांनी देखील फिर्याद दिली असून आपण आळकुटी येथे जात असताना आपली कार अडवून अनिल गंधाक्ते व सोबतच्या चार-पाच जणांनी आपल्या गाडीची काच फोडली. गाडीतील कागदपत्रे खाली फेकली. तसेच आपल्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली, अशी तक्रार केली आहे. यावरून अनिल गंधाक्ते यांचे विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या प्रकरणातील व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये राहुल शिंदे हे कारजवळ उभे आहेत. तसेच त्यांची कागदपत्रे रस्त्यावर पडलेली दिसत आहेत. या कागदपत्रांसोबत पैशांचे बंडलही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विखे हे या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करत आहेत हे मी अगोदरपासून सांगत होतो. आता तशी उदाहरणे समोर येत आहेत. वनकुटे येथेही काही लोक पैशाचे वाटप करत होते त्यांनाही लोकांनी अडवले आहे. प्रशासन विखे यांच्या दबावाखाली आहे. रात्री मी सिद्धार्थनगर परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो तरी पोलीस उपनिरीक्षक हे थेट त्या घरामध्ये माझा पाठलाग करत आले. ही दडपशाही आहे. आमचा पाठलाग केला जातो. मात्र सत्ताधारी लोक सर्रास पैसे वाटत असताना त्यांचे वर पोलीस काहीही कारवाई करत नाहीत असे दिसत आहे, असा आरोप लंके यांनी केला आहे.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेahmednagar-pcअहमदनगरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nilesh lankeनिलेश लंके