नवी दिल्ली : लोकसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा द्रमुकच्या थंबी दुराई यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वेळा खासदार राहिलेल्या 72 वर्षीय सुमित्र महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव अध्यक्षपदासाठी आणला आणि थंबी दुराईंसह सर्वपक्षीय 19 खासदारांनी त्याला पाठिंबा दिला.
पंतप्रधानांच्या प्रस्तावाला ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला संसदीय कार्य राज्यमंत्री संतोष गंगवार तर स्वराज यांच्या प्रस्तावाला गिरिराजसिंह यांनी अनुमोदन दिले. दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मोदींशी केलेली दीर्घ चर्चा पाहता लोकसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा द्रमुकचे एम. थंबीदुराई यांचे नाव चर्चेत आले आहे. ते 1985आणि 89 मध्ये लोकसभेचे उपाध्यक्ष राहिले आहेत.
‘ताई’ म्हणून लोकप्रिय
सुमित्र महाजन ‘ताई’ या नावाने लोकप्रिय आहेत. त्या 2क्क्2-क्4 या काळात मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि पेट्रोलियम खात्याच्या राज्यमंत्री होत्या. स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणामुळे सर्वच पक्षांमध्ये त्यांचे मित्र आणि प्रशंसक आहेत. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1943 रोजी चिपळूण येथे झाला. त्यांना दोन मुले आहेत. सुमित्र महाजन यांनी इंदूर विद्यापीठातून सध्याच्या देवी अहिल्या विद्यापीठातून एम.ए. एलएलबी केले आहे. 1989 मध्ये त्या सर्वप्रथम लोकसभेवर निवडून आल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)