शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

सनई-चौघड्यांचे ‘सूर’; सव्वा कोटी वसूल

By admin | Published: January 12, 2016 12:48 AM

जिल्हा बॅँक वसुली मोहीम : ‘इंदिरा’, ‘बिजोत्पादक’ने दिले धनादेश; ‘गायकवाड’ सोमवारी पाच कोटी भरणार

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांनी गांधीगिरी पध्दतीने केलेल्या मोहीमेला काही प्रमाणात यश आले. ‘इंदिरा’ कारखान्याने १ कोटी १६ लाख, तर बिजोत्पादक संघाने पाच लाखाचे धनादेश बॅँकेकडे दिले. उदयसिंगराव गायकवाड कारखान्याच्या थकबाकीतील पाच कोटी सोमवारपर्यंत, तर तंबाखू संघाचे डॉ. संजय पाटील यांनी शेतीमाल प्रक्रिया संस्था वगळता उर्वरित चार संस्थांची थकबाकी भरण्याची तयारी दाखवली आहे. सनईचौघड्याचा गजर, दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन संचालक दारात गेल्याने थकबाकीदार चांगलेच हबकले.जिल्हा बॅँकेने बड्या थकबाकीदाराविरोधात मोहीम उघडली आहे. सोमवारी सनईचौघड्यासह बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने दुपारी एक वाजता गायकवाड कारखान्याचे मानसिंगराव गायकवाड यांच्या ताराबाई पार्क येथील घरावर मोर्चा नेला. गुलाबपुष्प देऊन आमदार मुश्रीफ यांनी मानसिंगराव गायकवाड यांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले. कारखाना चालविण्यास घेतलेले ‘अथणी’ शुगर्सचे श्रीमंत पाटील यांच्या मुलाशी आमदार मुश्रीफ यांनी फोनवरून चर्चा केली. त्यांनी सोमवारपर्यंत पाच कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवली. संचालकांनी त्यानंतर ‘इंदिरा’ कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई यांच्या रमणमळा येथील घरावर मोर्चा वळविला. देसाई घरी नसल्याने अध्यक्ष मुश्रीफ यांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. आपण बॅँकेत आल्याचे सांगितल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे चर्चेसाठी बॅँकेत गेले. बॅँकेतून निरोप येईपर्यंत आमदार मुश्रीफ व संचालक तिथेच तळ ठोकून होते. देसाई यांनी बॅँकेत येऊन १ कोटी १६ लाखांचा धनादेश दिला. जिल्हा बिजोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या ताराबाई येथील निवासस्थानी सनई चौघड्यासह संचालक दाखल झाले. एकरकमी परतफेड योजनेंतर्गत ६२ लाख रुपये होतात, त्यापैकी ५ पटरक्कम आता भरण्याची मागणी संचालकांनी पाटील यांच्याकडे केली. पण संघाची मार्केट यार्ड येथील ९ हजार चौरस फूट जागा बापूसाहेब पाटील यांना विक्री केली असताना त्यांनी ११ हजार चौरस फुटाचा ताबा घेतला आहे. त्यांच्याकडील २ हजार चौरस फूट जागा विक्री करून बॅँकेचे पैसे भरण्याची तयारी पाटील यांनी दाखवली. पण तोपर्यंत ५ लाख रुपये भरा, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. बऱ्याच चर्चेनंतर पाच लाख रुपयांचा धनादेश पाटील यांनी संचालकांकडे सुपूर्द केला. डॉ. संजय पाटील यांच्या रुक्मिणीनगर येथील निवासस्थानी संचालक गेले. पाटील हे मुंबई येथे असल्याने त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्र टोबॅको फेडरेशन, मयूर वाहतूक, एस. के. पाटील बॅँक, तंबाखू खरेदी विक्री संघ या चार संस्थांची थकबाकी भरण्यास तयार आहे. पण शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून अडीच कोटी परस्पर उचलल्याबद्दल बॅँकेने आपणावर दावा दाखल केल्याने त्याबाबत चर्चा करणार नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.वसुली पथकात उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक निवेदिता माने, पी. जी. शिंदे, प्रा. जयंत पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अनिल पाटील, विलासराव गाताडे, उदयानी साळुंखे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आसिफ फरास, संतोष पाटील, आदी सहभागी झाले होते. अडीच महिन्यांत सव्वा दोन कोटींची वसुलीगेल्या अडीच महिन्यांत १७ संस्थांनी ओटीएसअंतर्गत ५ ते २५ टक्क्यांपर्यंत रक्कम भरली आहे. ओटीएसअंतर्गत या संस्थांकडून १४ कोटी ६८ लाख ७६ हजार रुपये रक्कम येणे होते. त्यापैकी २ कोटी २७ लाख १७ हजार रुपये वसूल झालेले आहेत. या संस्थाची वसुली खालीलप्रमाणे : संस्थायेणेबाकीओटीएसअंतर्गत रक्कमभरलेली रक्कम कोल्हापूर अर्बन सोसायटी ४९ लाख २९ हजार१५ लाख ४७ हजार३ लाख ९० हजार कालिमाता यंत्रमाग (इचलकरंजी)३१ लाख ७१ हजार१९ लाख ३६ हजार५ लाखडेक्कन टेक्सस्टाईल (इचलकरंजी)३ कोटी ४४ लाख७५ लाख १४ हजार४ लाख ५० हजार इंदिरा पतसंस्था (कागल)१ कोटी ४१ लाख५८ लाख ७७ हजार३ लाखराधानगरी भाजीपाला (राशिवडे)४३ लाख ९२ हजार३८ लाख १५ हजार१ लाख ३० हजार रत्नाप्पाण्णा पाणीपुरवठा (कसबा सांगाव)-१६ लाख ७२ हजार१ लाख ८० हजार कृष्णगंगा दूध (पुंगाव)-२ लाख ६९ हजार२० हजारवाहनधारक पतसंस्था२ कोटी ५ लाख८८ लाख ७० हजार ४ लाख २० हजार महालक्ष्मी दूध संघ४ कोटी ८५ लाख२ लाख ७० हजार१५ लाखधनलक्ष्मी पतसंस्था (निढोरी)६६ लाख ९२ हजार३ लाख ६६ हजार ३२ हजार कोल्हापूर खरेदी-विक्री संघ९१ लाख २२ हजार३३ लाख ४० हजार१ लाखपंत वस्त्रोद्योग (तिळवणी)३ कोटी ४ लाख१ कोटी ४७ लाख ५० लाखपश्चिम भुदरगड पतसंस्था (कडगाव)१ कोटी ८४ लाख८४ लाख ८९ हजार४ लाखराजीव गांधी पतसंस्था (सांगाव)२९ लाख ५९ हजार-१ लाख ७५ हजार बीजोत्पादक संघ१ कोटी २७ लाख६२ लाख २ हजार५ लाखशंकर-पार्वती पतसंस्था (गंगापूर) १ कोटी ६८ लाख९१ लाख ४० हजार१० लाख २० हजारविजयमाला देसाई ऊस तोडणी ९ कोटी ४० लाख४ कोटी ६० लाख१ कोटी १६ लाख ‘पी.जीं.’नी धरले मानसिंगरावांचे पायबॅँकेचे संचालक पी. जी. शिंदे यांनी दारात जाताच मानसिंगराव गायकवाड यांचे पाय धरले. ‘बाबा आम्हाला एवढे यातून सोडव’ अशी विनंती केल्याने उपस्थित संचालकांसह कर्मचारी चांगलेच अवाक् झाले. संजय पाटलांच्या दारात माने वहिनी पुढे निवेदिता माने व डॉ. संजय पाटील तर मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील-पेरीडकर यांचे राजकीय सख्य जगजाहीर आहे. गायकवाड यांच्या दारात वसुलीसाठी पेरीडकर जाणार का? याविषयी उत्सुकता होती, पण ते आले नाहीत. माने या मात्र पाटील यांच्या निवासस्थानाच्या दारात संचालकांच्या अगोदरच हजर होत्या.वसंतराव पाटील कुक्कुटपालन संस्थेची ओटीएसनुसार ४ कोटी २५ लाख रुपये बाकी आहे. संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवूनही त्याची किंमत ५० लाख होते. विजयमाला देसाई भडकल्याआपण बॅँकेत आले असताना संचालक मंडळ घरावर मोर्चा घेऊन गेलेच कसे? अशी विचारणा विजयमाला देसाई यांनी केली. आम्ही तुमचे कर्ज बुडविणार आहे काय? असे इंग्रजीतून संवाद साधल्याने अध्यक्ष मुश्रीफही गोंधळून गेले. संस्थेचे नावएकूण थकबाकीतडजोड रक्कमभरलेली रक्कम बिजोत्पादक संघ१ कोटी २७ लाख६२ लाख २ हजार५ लाखविजयमाला देसार्ई ऊस तोडणी९ कोटी ४० लाख४ कोटी ६० लाख१ कोटी १६ लाख